Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तान ट्रेन हायजॅकचा बदला घेणार? अफगानिस्तानवर हल्ला करण्याची पाकची तयारी?

जाफर एक्सप्रेस ट्रेनचे बलुचिस्तानमध्ये अपहरण करण्यात आले. या घटनेने पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ उडाली. बलुचिस्थान लिबरल आर्मी म्हणजे बीएलएने जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ल्या केला होता. या प्रकाराने शाहबाज शरीफपासून मुनीरच्या सैन्यापर्यंत सर्वांना जोरदार धक्का बसला. या घटनेत बीएलएने पाकिस्तानच्या २१४ लष्करी बंधकांना मारल्याचा दावा केला जात आहे. आता याच हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी पाकिस्तानने केल्याची माहिती मिळत आहे.

Pakistan preparing to attack Afghans

लष्कराचे जवान मारले

बीएलएने या ट्रेनचे अपहरण करुन २१४ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान सरकार या दाव्यांना खोडून काढले. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, त्यांच्यापैकी फक्त ३१ लोकांचा मृत्यू झाला. त्यात १८ लष्करी जवानांचा समावेश आहे. तथापि, रेल्वे हल्ल्यावरून पाकिस्तानने अफगाण सरकारला कोंडीत पकडले आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा हात असल्याचा आरोप आहे.

अफगानवर करणार हल्ला?

आशिया टाईम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. असे मानले जाते की पाकिस्तान आता जाफर एक्सप्रेसवरील बीएलए हल्ल्याचा बदला घेण्याच्या मनःस्थितीत आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ला करू शकतो. त्याच्या देशातील रोष लक्षात घेऊन तो हे पाऊल उचलू शकतो. जाफर एक्सप्रेस रेल्वे हल्ल्याचे दुःख विसरण्यासाठी शाहबाज शरीफ यांचे सरकार अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा विचार करत आहे. तथापि, हा हल्ला कधी आणि कसा होईल याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पाकिस्तान बदला घेणार?

गुरुवारी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, भारत पाकिस्तानमधील दहशतवादात सहभागी आहे. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात सहभागी असलेले बीएलएचे लढवय्ये अफगाणिस्तानातील त्यांच्या मालकांच्या आणि नेत्यांच्या संपर्कात होते. जाफर एक्सप्रेस रेल्वे हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' अफगाणिस्तानात असल्याचेही त्यात म्हटले आहे. तथापि, तो मास्टरमाइंड कोण आहे हे सविस्तरपणे उघड झाले नाही. त्यामुळे जाफर एक्सप्रेस रेल्वे हल्ल्याचा बदला पाकिस्तान घेईल अशी शक्यता वाढली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+