Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टँक हिसकावला, पाक सैनिकांना पळवू-पळवू हाणले; तालिबान्यांनी मुनीरांच्या सैनिकांची इज्जत काढली,Video!

Taliban Captures Pakistani Tank Video : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा मोठा लष्करी संघर्ष उफाळून आला आहे. दक्षिण अफगाणिस्तानातील स्पिन बोल्दाक (Spin Boldak) जिल्ह्यात बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) रात्रभर भयंकर चकमकी सुरू होत्या. तालिबानच्या जोरदार आणि नियोजनबद्ध हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याला मोठा धक्का बसला.

या हल्ल्यांनी हतबल झालेल्या पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून स्पिन बोल्दाक भागात हवाई हल्ले केले आहेत. या संघर्षात दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेदरम्यान पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील सैन्याची इज्जत काढणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सीमेवरील तणावासोबतच पाकिस्तानची नाचक्कीही वाढली आहे.

Pakistan Afghanistan Border Clash

चकमकी आणि दोन्ही बाजूंचे दावे

१. तालिबानी दहशतवाद्यांना मारल्याचा पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानी सैन्याच्या माहितीनुसार, त्यांच्या सुरक्षा दलांनी स्पिन बोल्दाक परिसरात किमान १५ ते २० तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दक्षिण अफगाणिस्तानमधील स्थानिक प्रवक्ते अली मोहम्मद हकमल यांनीही मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. स्पिन बोल्दाक जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या घटनेत डझनभर लोक जखमी झाल्याची पुष्टी केली आहे.

२. पाकिस्तानी टँक ताब्यात घेतल्याचा अफगाणिस्तानचा दावा

या युद्धात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. तालिबान्यांनी अनेक पाकिस्तानी चौक्या, शस्त्रे आणि महत्त्वाचे म्हणजे एक टँक ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानी लष्कराच्या अनेक प्रतिष्ठानांचा नाश केल्याचा त्यांचा दावा आहे.

अफगाणिस्तान सरकारने त्यांच्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिक रस्त्यावरून ताब्यात घेतलेला पाकिस्तानी टँक चालवताना दिसत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाल्याचे बोलले जात आहे.

युद्धाची सुरुवात आणि प्रत्युत्तर

मंगळवारीपाकिस्तान-अफगाणिस्तानच्या वायव्य सीमावर्ती भागात पहिल्यांदा चकमकी सुरू झाल्या. पाकिस्तानी राज्य माध्यमांनी अफगाण सैन्यावर विनाकारण गोळीबार केल्याचा आरोप केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने मोठी कारवाई केली. जिओ टीव्ही आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने अफगाणच्या बाजूकडील टँक आणि लष्करी चौक्यांचे मोठे नुकसान करून आपली ताकद दाखवली.

तालिबान केंद्र उद्ध्वस्त करण्याचा दावा

द टाइम्स ऑफ इंडिया (TOI) च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याने कुर्रम सेक्टरमध्ये एका तालिबानी चौकीला आणि टँकला लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये अनेक मृतदेह आढळले.

पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, या कारवाईत एक तालिबानी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुढील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आपल्या संपूर्ण सीमेवर हाय अलर्टवर आहे.

दोन्ही देशांनी केलेले दावे आणि व्हायरल झालेले व्हिडिओ सीमेवरील तणाव किती वाढला आहे, हे स्पष्टपणे दर्शवतात. दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रांमधील या वाढत्या संघर्षाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+