'बाबरीची वीट रचू..असीम मुनीर अजान देतील'; पाक संसदेत या 'स्पाई गर्ल'ने भारतविरोधात गरळ ओकली!
Pakistan MP Palwasha Khan Controversial Statement on India : जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्लयानंतर भारत पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झालेला आहे. भारताकडून निर्बंध लावल्यानंतर पाकिस्तात आता खडबडून जागा झालेला आहे.
दोन्ही देशातील नेते एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. परंतु, पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची गुप्तहेर अशी ओळख असलेल्या महिला सिनेटर पलवाशा खान यांनी तर आता हद्दच पार केली.
भारताविरोधात प्रचंड गरळ ओकली. बाबरी मशिदीचा पाया आमचे सैनिक रचतील अन् त्यात पहिली अजान पाकिस्तानचे आर्मी चिफ असीम मुनीर देतील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. सदर भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

काय म्हणाल्या पलवाशा खान?
असे म्हटले जाते की, पाकिस्तानच्या अभ्यासक्रमात भारतविरोधी शिक्षण दिले जाते. हिंदूंचा द्वेष करण्याची शिकवण त्यांच्या अभ्यासक्रमात आहे की काय असे वाटायला लागते. त्याचे कारण, तेच पुस्तके वाचून पाकिस्तानच्या संसदेत पोहोचलेली पलवाशा खान हीने गरळ ओकणारे विधाने केली आहेत. पलवाशा खान पाकिस्तानच्या संसदेत बोलताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत ती बोलते की, पाकिस्तानचा एक सैनिक बाबरी मशिदीच्या पायाची पुन्हा वीट रचेल आणि असीम मुनीर त्यात पहिली पहिली अजान देतील.
Listen to the balderdash of Zardari's spy girl, Palwasha Khan, who was used for an alleged honey trap, and former DGISI Lt Gen Zaheer ul Islam, who allegedly had to marry her because he got her pregnant. Are they still married? https://t.co/kvL2PRNoNu pic.twitter.com/PGTyCVAHsQ
— Adil Raja (@soldierspeaks) April 29, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर द्वेषपूर्ण विधाने!
पलवाशा खान यांनी देशाच्या संसदेत भारताविरुद्ध गरळ ओकली. विशेषत: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती असताना अशा प्रकारे विधाने करणे घातक ठरू शकते. संवेदनशिल परिस्थिती असताना अशी विधाने केल्याने दोन्ही देशात तणाव अधिक वाढण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.
..तर दिल्लीचे लाल किल्ला मैदान रक्ताने माखेल
पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील सिनेट सदस्य पलवाशा खान यांनी पुढे बोलताना भारताला इशारा दिला. त्या म्हणाल्या की, पाकिस्तान केवळ त्याच्या ७ लाख सैनिकांच्या सैन्यावर अवलंबून नाही, तर त्याला २५ कोटी देशभक्त नागरिकांचा पाठिंबा आहे.
जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीच्या लाल किल्ल्याचे मैदान रक्ताने माखले जाईल", असे म्हणत त्यांनी मोठी गरळ ओकली.
जो कोणी पाकिस्तानकडे वाईट नजरेने बघेल, त्याचा डोळ्या काढून टाकला जाईल, असे म्हणत त्यांनी भारताला नाव न घेता इशारा दिला.
कोण आहे पलवाशा खान?
पलवाशा खान या पाकिस्तानच्या महिला सिनेटर आहेत. आसिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांना पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची 'स्पाय गर्ल' म्हटले जाते.
पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल रझा म्हणाले होते की, पलवाशा खान गर्भवती राहिल्याचा आरोप आहे. त्यानंतर माजी डीजीआयएसआय लेफ्टनंट जनरल झहीर उल इस्लाम यांना तिच्याशी इच्छा नसताना देखील लग्न करण्यास भाग पाडण्यात आले.
पलवाशा खान या पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृह सिनेटच्या सदस्या आहेत. त्या २००८ ते २०१३ पर्यंत पाकिस्तानच्या संसदेच्या सदस्य होत्या. याशिवाय पलवाशा खान यांच्याकडे पीपीपीच्या उप-माहिती सचिवपदाची देखील जबाबदारी आहे.












Click it and Unblock the Notifications