Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

OpenAI चा पर्दाफाश करणारे भारतीय अभियंता सुचीर बालाजी यांचा मृत्यू, यावर एलॉन मस्क काय म्हणाले?

Suchir Balaji: ओपनएआयबाबत खुलासा करणारे भारतीय अभियंता सुचीर बालाजी अमेरिकेत मृतदेह आढळून आला आहे. 26 वर्षीय सुचीर बालाजी सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे भारतीय अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) संशोधक होते. सुचीरने आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे.

सॅन फ्रान्सिस्को पोलिस विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट रुएका यांनी फोर्ब्सला सांगितले की, 26 वर्षीय सुचीर बालाजीचा मृत्यू आत्महत्येने झाल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात कोणताही पुरावा आढळला नाही. मर्करी न्यूजनुसार, सुचीर बालाजी 26 नोव्हेंबर रोजी बुकानन स्ट्रीटवरील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे.

Suchir Balaji on Elon musk

सुचिर बालाजींच्या निधनावर एलॉन मस्क म्हणाले - "हम्मम"

सुचिर बालाजीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्याने नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 पर्यंत OpenAI साठी काम केले. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याशी अब्जाधीश एलॉन मस्क यांचा दीर्घकाळ वाद होता. त्यानंतर आता एलन मस्कची यांची सोशल मिडियावरील पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'हम्मम' अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

OpenAI ची स्थापना 2015 मध्ये एलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांनी केली होती. तीन वर्षांनंतर एलोन मस्कने OpenAI सोडले आणि दुसरे प्रतिस्पर्धी स्टार्ट-अप xAI ची स्थापना केली. ओपनएआय ही मक्तेदारी असल्याचा आरोप मस्कने गेल्या महिन्यात केला होता.

OpenAI बद्दल सुचिर बालाजी काय म्हणाला होता?

ऑक्टोबरमध्ये सुचीर बालाजी यांनी ओपनएआय कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला होता. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुचीर बालाजी म्हणाला होता की, "माझ्या म्हणण्यावर तुमचा विश्वास असेल तर कंपनी सोडली पाहिजे."

चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. ऑक्टोबरमध्ये X वर सोशल मीडिया पोस्टमध्ये बालाजीने योग्य वापर आणि जनरेटिव्ह एआय बद्दल देखील लिहिले होते.

ChatGPT वर दीड वर्षाच्या कामासह चार वर्षांच्या त्याच्या अनुभवाबद्दल बोलतांना बालाजीने निष्कर्ष काढला की "बऱ्याच जनरेटिव्ह एआय उत्पादनांसाठी वाजवी वापर हा एक अविश्वसनीय संरक्षण आहे."

"सुरुवातीला मला कॉपीराइट, वाजवी वापर इत्यादींबद्दल फारशी माहिती नव्हती, पण GenAI कंपन्यांवर दाखल झालेले सर्व खटले पाहिल्यानंतर मी उत्सुक झालो. तेव्हाच मी हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला." शेवटी असा निष्कर्ष काढला की, अनेक जनरेटिव्ह एआय उत्पादनांसाठी वाजवी वापर हा अत्यंत अविश्वसनीय संरक्षण वाटतो, कारण ते वापरत असलेल्या डेटाशी स्पर्धा करणारे पर्याय तयार करू शकतात ."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+