Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेत 'वन बिग ब्युटीफुल' विधेयकाचे कायद्यात रुपांतर; त्याचा भारतीयांवर काय होणार परिणाम?

One Big Beautiful Bill : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (दि. 4 जुलै) रात्री उशिरा व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका भव्य समारंभात 'वन बिग ब्युटीफुल' विधेयकावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

मोठ्या कर सवलती आणि सरकारी खर्चात कपात करण्याशी संबंधित हा कायदा ट्रम्प प्रशासनाच्या आर्थिक धोरणाची एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या बहुसंख्य प्रतिनिधी सभागृहाने 218-214 च्या जवळच्या फरकाने याला मंजुरी दिली.

ट्रम्प यांनी यावेळी सांगितले की, हा कायदा अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करेल आणि सामान्य करदात्यांना दिलासा देईल. ट्रम्प यांनी या विधेयकाचे वर्णन अमेरिकेसाठी "सर्वात मोठी भेट" असे केले आहे. ट्रम्प म्हणाले, 'मी देशभरातील लोकांना इतके आनंदी कधीच पाहिले नाही कारण विविध वर्गातील लोकांना आता सुरक्षित वाटत आहेत.

One Big Beautiful bill

'बिग ब्युटीफुल विधेयकात' काय आहे?

'वन बिग ब्युटीफुल' कायद्यामध्ये कर कपात, लष्करी आणि संरक्षण क्षेत्रासाठी वाढलेले बजेट, ऊर्जा उत्पादन वाढवण्यासाठी अतिरिक्त खर्च आणि आरोग्य आणि पोषण योजनांमध्ये कपात अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे. हा कायदा बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीसाठी बजेट वाढवण्याशी देखील जोडलेला आहे.

कायद्याची संपूर्ण माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नसली तरी, ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की हे पाऊल मध्यमवर्गाला दिलासा देईल, लहान व्यावसायिकांना प्रोत्साहन देईल आणि एकूण आर्थिक विकासाला गती देईल.

या कायद्याद्वारे काय होणार फायदा?

  • ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील कर सूट वाढविण्यात आली आहे.
  • मेडिकेड (आरोग्य योजना) आणि फूड स्टॅम्पमध्ये $1.2 ट्रिलियनने कपात करण्यात आली आहे.
  • इमिग्रेशन नियम कडक करण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हद्दपारीची तयारी करण्यात आली आहे.
  • सुमारे 12 दशलक्ष लोक (1.2 कोटी) त्यांच्या आरोग्य विमा योजनेपासून वंचित राहू शकतात.
  • या 'बिग ब्युटीफुल' विधेयकाचा भारतीयांवर काय परिणाम होईल?

भारतात पैसे पाठवणे थोडे महागणार!

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेतून भारतात किंवा इतर कोणत्याही देशात पैसे पाठवण्यावर १% कर (पूर्वी प्रस्तावित केलेल्या ५% पेक्षा कमी) आकारला जाईल. हा नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. वारंवार किंवा मोठ्या प्रमाणात पैसे पाठवणाऱ्या अनिवासी भारतीयांना त्यांच्या योजनेचा पुनर्विचार करावा लागू शकतो.

परदेशी उत्पन्नात कोणताही बदल नाही

विदेशातील मालमत्ता किंवा भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नावर सध्याचे कर नियम लागू राहतील. जर तुम्ही भारतात कर भरला तर तुम्हाला अमेरिकेत त्याचे श्रेय मिळेल, म्हणजेच दुहेरी करातून सूट कायम राहील.

सीमा ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई

ट्रम्प यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी हद्दपारी कारवाई करण्याची योजना आखली आहे. असा अंदाज आहे की सुमारे १८,००० भारतीय नागरिक बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाले आहेत. अमेरिका आता कडक सीमा नियम लागू करण्याची, सुरक्षा बजेट वाढवण्याची आणि मानवी तस्करी रोखण्याची तयारी करत आहे.

कायदेशीररित्या राहण्यासाठी शुल्क देखील वाढू शकते!

  • आश्रयासाठी - किमान $१००
  • वर्क परमिट - $५५० तात्पुरता
  • संरक्षित दर्जा - $५००
  • मानवतावादी पॅरोल - $१०००
  • सीमेवरून बेकायदेशीर प्रवेशासाठी $५,००० दंड.

कमी उत्पन्न असलेल्या लोकांना कोणतीही फी माफी मिळणार नाही. ट्रम्पच्या या कायद्याचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांवर थेट परिणाम होणार आहे. पैसे पाठवणे थोडे महाग होईल, कायदेशीर राहण्याची आणि व्हिसा शुल्क वाढेल आणि बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई वाढेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+