युक्रेनने रशियाला दाखवला इंगा; केली ही कामगिरी, मोदींंनी केली मध्यस्थी, नेमकं काय घडलंय, वाचा
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. अनपेक्षितपणे युक्रेनने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे रशियाला धक्का बसला आहे. विविध देशानी मध्यस्थी करूनही कोणीही अद्याप माघार घेतलेली नाही. या दोन देशातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. या संघर्षादरम्यानच युक्रेनने रशियाला जिव्हारी लागेल असा धक्का दिला आहे.
मोदींनीही केली होती मध्यस्थी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना भेट देऊन दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली. ही युद्धाची वेळ नाही असे मोदी यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांना सांगितले. दोन्ही देशांची एकाच दौऱ्यात भेट घेणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मात्र मोदींच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही देशांनी आपापल्या तलवारी म्यान केलेल्या नाहीत. एकीकडे इस्राइल आणि पॅलेस्टाईन- इराण-लेबनॉन -येमेन असा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष जगाच्या दृष्टीने तापदायक ठरला आहे.

रशियाशी तेल व्यवहार भारताला फायदेशीर
पश्चिम आशियाई देशांबरोबरच रशिया देखील मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया आणि युक्रेनचा संघर्ष सुरू झाल्यानंतर पश्चिमी देशांनी रशियन तेल खरेदी थांबवली त्यामुळे रशियाची मोठी कोंडी झाली. भारताने मात्र रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली. भारताच्या या भूमिकेवर अनेक राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली. पण तेल खरेदी हा भारताचा अंतर्गत विषय असून जगाने त्यात नाक खूपसण्याची आवश्यकता नाही असा सज्ज इशारा भारताकडून देण्यात आला. भारतीय कंपन्यांनी रशियन तेलावर प्रक्रिया करून ते पश्चिमी देशांना विक्री केले आणि त्यातून चांगला नफा मिळवला.
युकेनची आश्चर्यकारक कामगिरी
युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष सुरूच असताना यादरम्यान युक्रेनने एक आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. युक्रेनला अमेरिकेकडून शस्त्रपुरवठा केला जातो. युक्रेनच्या ताब्यात एफ 16 हे अमेरिकी बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाने रशियन बनावटीच्या सुखोई 34 ला आसमान दाखवले. युक्रेनच्या सीमेतच ही घटना घडली. युद्ध विषयक घटनांचा आढावा घेणाऱ्या अनेक ब्लॉगर्सनी या घटनेचा ठळक उल्लेख केला आहे.
रशियासाठी धक्कादायक घटना
मॉस्कोशी संबंधित एका ब्लॉगरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एफ 16 हे विमान अत्यंत कार्यक्षम असून त्याने सुखोई 34 चा पाडाव केल्याचे या ब्लॉगरचे म्हणणे आहे. रशियाचे सुखोई विमान युक्रेन हद्दीत बॉम्ब हल्ला करण्यासाठी जात होते मात्र एफ 16 ने त्याचा पाडाव केला. यापूर्वीही युक्रेनने सुखोईचा पाडाव केला होता. पुन्हा एकदा सुखोईला मात खावी लागली आहे रशियासाठी ही घटना विलक्षण धक्कादायक आहे. आपण युक्रेनचा सहज पराभव करू असा रशियाचा अंदाज होता. मात्र झेलन्सकी यांच्या नेतृत्वाखालील युक्रेनने प्रचंड आक्रमक पवित्रा दाखवून संघर्ष कायम ठेवला आहे. रशियन बनावटीच्या युद्ध साहित्याला युक्रेन पुरून उरला आहे. सुखोई 34 चा पाडाव रशियासाठी धक्कादायक आहे.












Click it and Unblock the Notifications