Nobel Prize 2024 : साहित्य विश्वातील नोबेल पुरस्काराची घोषणा, 'या' देशातील लेखिकाला मिळाला मान
Nobel Prize 2024 : अतिशय मानाचा असा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कारासंदर्भात अतिशय महत्त्वाची व मोठी बातमी समोर आलेली आहे. रसायनशास्त्रानंतर आता साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत.
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, हा पुरस्कार यावर्षी दक्षिण कोरियाचे लेखिका हान कांग यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या विपुल काव्यात्मक गद्य लेखणासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

मानवी जीवनावर आधारीत गद्य लेखन
हान कांग यांच्या गद्य लिखानात प्रामुख्याने ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनाच्या नाजूकपणावर प्रकाश टाकल्याचे पाहायळा मिळतो. याआधी 2024 सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवार हा निर्णय घेतला.
तसेच रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने सांगितले की, यंदा हा पुरस्कार तीन जणांना देण्यात येणार आहे. डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना नोबेल पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. डेव्हिड बेकर यांना 'कंप्युटेशनल प्रोटीन डिझाईन'साठी पुरस्कृत केले जाईल आणि उर्वरित अर्धा भाग डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना 'प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन'साठी संयुक्तपणे देण्यात येईल.
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने पुढे सांगितले की, शांतता पुरस्काराच्या घोषणेसोबतच यंदाचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर केला जाईल. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर होणार आहे. यापूर्वी मंगळवारी अकादमीने जॉन जे. यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केले. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांच्या नावाची घोषणा केली.












Click it and Unblock the Notifications