शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा, 'निहॉन हिदानक्यो' या संस्थेला बहुमान, जाणून घ्या- संस्थेची कामगिरी

जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कार 2024 ची घोषणा गे्ल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. रसायनशास्त्र, साहित्यानंतर आज यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जपानी संस्था असलेली निहॉन हिदानक्यो या संस्थेच्या माध्यमातून हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलेले आहे. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.

Nobel Prize 2024

दुसरीकडे या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानीसंस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


काय आहे नोबेल पुरस्काराचा इतिहास?

डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात 1901 मध्ये झाली असून 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल 10 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे दिले जात आहेत. दरवर्षी 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपयांचे नोबेल पारितोषिक वितरण केले जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+