चीनमध्ये आढळला कोरोनासारखा नवा विषाणू; मानवांमध्ये पसरण्याचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या सर्व काही!
Corona Virus : चिनी संशोधकांच्या एका पथकाने HKU5-CoV-2 नावाचा एक नवीन वटवाघळातील कोरोना विषाणू शोधला आहे. जो मानवांमध्ये संक्रमित होण्याचा सर्वाधिक धोकादायक बनला आहे. हा विषाणू SARS-CoV-2 सारख्याच रिसेप्टरशी बांधला जातो. जो COVID-19 सारख्या आजारासारखा धोका निर्माण करू शकतो.
चीनमध्ये आणखी एका नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा चीनमधील एका तज्ज्ञांनी केला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो. मानवी रिसेप्टर वापर केला जातो जे कोरोनाचं कारण ठरतात. अशा परिस्थितीत आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की, कोरोना व्हायरस पुन्हा जगात पसरणार आहे का?.
बॅटवुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी झेंगली यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने हा नवीन व्हायरस शोधल्याचा दावा केला आहे. झेंगली हे ग्वांगझू लॅबोरटरीचे प्रमुख वायरोलॉजिस्ट असून त्यांचा रिसर्च मंगळवारी (दि.18) सेल जर्नलमध्ये पब्लिश झाला आहे.

व्हायरस मानवांमध्ये पसरण्याचा धोका!
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आम्ही HKU5-CoV च्या वेगळ्या वंशाचा (वंश-2) शोध लावल्याची नोंद केली आहे. जो केवळ वटवाघळांपासून वटवाघळांपर्यंतच नाही तर मानवांमध्ये आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये देखील सहजपणे पसरू शकतो. जेव्हा वटवाघळांच्या नमुन्यांमधून व्हायरस वेगळा केला गेला तेव्हा त्याने मानवी पेशी तसेच कृत्रिमरित्या वाढवलेल्या पेशींना संसर्गित केले. वटवाघळांपासून मानवांमध्ये या व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे, जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संक्रमणाद्वारे देखील पसरू शकतो.
साऊथ चायना मॉर्निंग साऊथ पोस्ट यांच्या अहवालानुसार, संशोधनात म्हटले आहे की नवीन 'HKU5' हा नवीन प्रकारचा कोरोनाव्हायरस आहे. हाँगकाँगमधील जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला होता. हा व्हायरस मर्बेकोवायरस सबजीन पासून उद्भवतो. यामध्ये मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) होणाऱ्या विषाणूचा समावेश आहे. हा विषाणू ACE2 रिसेप्टरशी संबंधित आहे. जो COVID-19 विषाणूद्वारे वापरला जातो. संशोधकांचे म्हणणे आहे की हा विषाणू मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त आहे. मात्र, कोविड 19 प्रमाणे धोकादायक नाही.
मानव व इतर सस्तन प्राण्यांमध्येही सहज पसरु शकतो
संशोधकांच्या मते , HKU5-CoV च्या वेगळ्या शोधाचा अहवाल आहे. जो केवळ वटवाघुळांपासून वटवाघळांमध्येच नव्हे तर मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्येही सहज पसरू शकतो. संशोधकांना असे आढळून आले की जेव्हा विषाणूंना नमुन्यांमधून वेगळे केले गेले. तेव्हा ते कृत्रिमरित्या वाढलेल्या पेशी तसेच मानवी पेशींना संक्रमित करतात. शी झेंगलीच्या टीमला असे आढळले आहे की, HKU5-CoV-2 आणि आंतरप्रजाती संसर्गाची शक्यता जास्त असू शकते. अशा परिस्थितीत या विषाणूवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. दरम्यान, त्यांच्या टीमने स्पष्ट केले आहे की, त्याची कार्यक्षमता कोविड व्हायरसपेक्षा खूपच कमी आहे आणि HKU5-CoV-2 ला मानवी लोकसंख्येसाठी धोका म्हणून पाहिले जाऊ नये.












Click it and Unblock the Notifications