Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माझ्या पत्नीवर हल्ला ही मोठी चूक, इराण, हिजबुल्लाहला मोठी किंमत चुकवावी लागेल- नेत्यान्याहूंचा इशारा

Netanyahu warns Iran, Hezbollah : इस्त्रायलचा इराण तसेच हिजबुल्लाहशी असलेला संघर्ष थांबता थांबेना, उलट या देशांतील संघर्षात भरच पडत आहे. इस्त्रायलने हिजबुल्लाह आणि हमासच्या प्रमुख नेत्यांची हत्या केल्यानंतर याला हमास, इराणकडून प्रत्युत्तर देणे सुरु केले आहे. यातच हमास नेता याह्या सिनवर याची हत्या केल्याचा दावा

इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून नेत्यान्याहू यांच्या पत्नीवर हमासने हल्ला केला.

Netanyahu warns Iran  Hezbollah

IDF हवाई हल्ल्यानंतर हमास-इस्त्रायलमध्ये मोठ्या तणावाची स्थिती आहे. यामुळेच पीएम नेत्यान्याहू यांच्या पत्नीवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर हमासचे मनसुबे पुन्हा एकदा समोर आले आहेत. आता या हल्ल्यानंतर पीएम नेत्यान्याहू यांचा पारा वाढला असून त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याची इराण आणि हिजबुल्लाहला मोठी किंमत चुकवावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नेतन्याहू यांनी इराण, हमास आणि हिजबुल्लाला याचसंदर्भात इशारा दिला आहे. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेला धोका असल्यास कोणत्याही परिस्थितीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पत्नीवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

काय म्हटले नेत्यान्याहू यांनी पोस्टमध्ये

एक्सवरील एका पोस्टमध्ये इस्त्रायली पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे की, "माझी आणि माझ्या पत्नीची हत्या करण्याचा इराण आणि त्यांचे हितबंधू हिजबुल्लाहने आज केलेला प्रयत्न ही एक गंभीर चूक होती. ती मला किंवा इस्रायल राज्याला सुरक्षित ठेवू देणार नाही. आमचे भविष्य." आम्हाला आमच्या शत्रूंविरुद्ध आमचे न्याय्य युद्ध चालू ठेवण्यापासून रोखणार नाही."

नेतन्याहू म्हणाले, "मी इराण आणि त्यांच्या पाठीराख्यांना सांगतो की, जो कोणी इस्रायली नागरिकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठवणाऱ्यांचा खात्मा करत राहू. आम्ही आमच्या ओलीसांना गाझामध्ये परत आणण्यासाठी वचनबद्ध आहोत." आमचे सर्व युद्ध उद्दिष्टे साध्य करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आमच्या प्रदेशातील सुरक्षेचे वास्तव बदलणे."

हिजबुल्लाहने केला होता ड्रोन हल्ला

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले, "इराणच्या एजंटांनी आज माझी आणि माझी पत्नी सारा यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. असे करून त्यांनी मोठी चूक केली आहे. हा हल्ला मला युद्ध सुरू ठेवण्यापासून थांबवणार नाही. मला हे स्पष्ट करायचे आहे.

""जो कोणी इस्रायलींना इजा करतो त्याला मोठी किंमत मोजावी लागेल अशी माझी इच्छा आहे." हिजबुल्लाहने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खाजगी निवासस्थानाला लक्ष्य करून ड्रोन हल्ला केला होता. नेतन्याहू यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या हैफाच्या सीझेरिया भागात शनिवारी सकाळी स्फोटाचा आवाज ऐकू आला. ड्रोनने ज्या इमारतीला लक्ष्य केले ते नेतान्याहू यांच्या घराचा भाग आहे. हिजबुल्लाहने आणखी दोन ड्रोन सोडले होते, जे इस्रायलने रोखले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+