Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nepal PM KP Oli Networth: चीनशी जवळीक अन् नेपाळ PMच्या संपत्तीत वाढ,जाणून घ्या ओलींची संपत्ती किती?

Nepal PM KP Oli networth : नेपाळमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेचा काळ सुरू आहे. 'जनरल-झेड' (Generation-Z) आंदोलनामुळे काठमांडूमधील वातावरण तापले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. अखेर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जगभरात एकच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडिया बंदी आणि वाढता भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आंदोलक आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत, ओली यांच्या वैयक्तिक संपत्ती आणि परदेशी गुंतवणुकीबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या एका अहवालानुसार, ओली यांच्याकडे त्यांच्या जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा कितीतरी अधिक पैसा आहे, ज्यात परदेशातील बँकांमधील ठेवींचाही समावेश आहे.

Nepal PM KP Oli net worth

स्विस बँकेतील खाते: एक मोठा खुलासा

ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या एका अहवालाने एक मोठा दावा केला आहे. त्यानुसार, पंतप्रधान ओली यांचे स्वित्झर्लंडमधील मीराबाउड बँकेच्या जिनेव्हा शाखेत एक खाते आहे, ज्यात सुमारे 41 कोटी रुपये जमा आहेत.

ही रक्कम दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ठेवण्यात आली असून, यातून त्यांना दरवर्षी जवळपास 1.87 कोटी रुपयांचा नफा मिळतो.

एका सार्वजनिक जीवन जगणाऱ्या नेत्याकडे देशाबाहेर एवढी मोठी रक्कम असणे, हे नेपाळमधील राजकीय आणि आर्थिक वर्तुळात वादाचा विषय बनले आहे. ही रक्कम ओली यांच्या जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त असल्याने विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चीनशी जवळीक आणि संपत्ती वाढ

पंतप्रधान ओली यांच्या संपत्तीतील अनपेक्षित वाढीला चीनशी त्यांचे वाढलेले संबंध कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. ग्लोबल वॉच अॅनालिसिस आणि इतर तज्ज्ञांच्या मते, नेपाळमध्ये अनेक मोठ्या पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ओलींनी वैयक्तिक आर्थिक लाभ घेतला.

या व्यवहारांमुळे त्यांची संपत्ती कमी काळात मोठ्या प्रमाणात वाढली. चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, ओली यांची संपत्ती त्यांच्या देशाच्या विकासाऐवजी वैयक्तिक हितासाठी वापरली गेली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंतप्रधानांच्या संपत्तीचा लेखाजोखा

  • 2015 मध्ये ओली जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्याकडे फक्त 14 तोळे सोने आणि बँक खात्यात सुमारे 7 लाख रुपये होते. मात्र, 2018 पर्यंत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.
  • तेव्हा त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यांच्याकडे 15 तोळे सोने, बँक खात्यात 20 लाख रुपये आणि भक्तपूरमध्ये जमीन होती.
  • त्यांच्या पत्नी राधिका शाक्य यांच्या नावावरही रोख रक्कम आणि मालमत्ता वाढल्याचे समोर आले. या माहितीमुळेच विरोधी पक्ष आणि माध्यमांनी त्यांच्या संपत्तीच्या वाढीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
  • सध्या सुरू असलेल्या राजकीय आंदोलनात, ही आर्थिक अनियमितता चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. नेपाळच्या जनतेचा राग केवळ भ्रष्टाचारावर नसून, सत्ताधाऱ्यांच्या अपारदर्शक आर्थिक व्यवहारांवरही आहे, त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+