नेपाळमध्ये पुन्हा विमान अपघात, सौर्या एअरलाइन्सचे विमान उड्डाणानंतर कोसळले, 19 पैकी 15 जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झाला असून आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्या एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान क्रॅश झाले आहे. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
विमानात होते 19 जण
टीआयएचे प्रवक्ते सुभाष झा यांनी सांगितले की, पोखरा जाणाऱ्या विमानात एअरक्रूसह 19 जण होते. सकाळी अकराच्या सुमारास हे विमान कोसळले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.

विमान आगीने वेढले
अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विमान आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसत आहे. त्याचवेळी, मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. विमानातील सर्व 19 जणांचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नेपाल में प्लेन क्रैश होने से ठीक पहले का वीडियो आया सामने, सरकारी हेल्पलाइन इस वीडियो की सत्यता की पुष्टि नहीं करता है #Kathmandu #PlaneCrash #Nepal pic.twitter.com/RrxXX6DvgQ
— Sarkarihelpline.com (@SarkariHelpline) July 24, 2024
पोखराला जात होते विमान
हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, अपघातस्थळावरून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काहीजण मृत झाल्याची भिती व्यक्त होत आहे.
Plane crashes during takeoff at Tribhuvan International Airport in Kathmandu. Updates to follow. #Kathmandu #PlaneCrash #Nepal pic.twitter.com/XFpMbQwAGR
— Sarkarihelpline.com (@SarkariHelpline) July 24, 2024
दरम्यान, टीआयएचे प्रवक्ते सुभाष झा यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेले कॅप्टन एमआर शाक्य यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. विमानतळावर दाट धूर दिसतो. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.
नेपाळ पोलिसांनी ट्विट केले आहे की विमानातील सर्व 19 लोक सौर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमान धावपट्टीच्या दक्षिणेकडील टोकावरून (कोटेश्वरच्या दिशेने) उड्डाण करत असताना अचानक उलटले आणि पंखाचे टोक जमिनीवर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
यानंतर विमानाने लगेच पेट घेतला. त्यानंतर ते धावपट्टीच्या पूर्वेकडील एअर हँगर आणि रडार स्टेशन दरम्यानच्या खड्ड्यात पडले. विमानतळावर धुराचे दाट ढग दिसत आहेत. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications