नेपाळमध्ये 40 भारतीयांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, 14 ठार, अनेक बेपत्ता
Nepal bus accident : नेपाळमधून मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस शुक्रवारी तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 14 जण ठार झाले आहेत.
तनहुन जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, बस नदीच्या काठावर पडली आहे. "यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस नदीच्या काठावर पडली आहे." ही बस पोखराहून काठमांडूला जात होती.

उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, अधिकारी या दुर्घटनेत उत्तर प्रदेशमधील कोणी सामील आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार ही बस गोरखपूरहून निघाली होती आणि तानपुनजवळ अपघात झाला. आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 16 जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळावरून समोर आलेले व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारे आहेत. नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार सुरू असून बचावकार्य सुरू आहे.
Indian passenger bus plunges into Nepal river, 14 bodies retrieved
— ANI Digital (@ani_digital) August 23, 2024
Read @ANI Story | https://t.co/zqIwAu8ORx#Nepal #UttarPradesh #Marsyangdiriver pic.twitter.com/D2J2O92h7Y
सशस्त्र पोलिस दल नेपाळ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शाळेतील वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखालील 45 सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांचे पथक आधीच अपघातस्थळी पोहोचले आहे आणि ते बचाव कार्य करत आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, "नेपाळमधील घटनेबाबत. बसमध्ये उत्तर प्रदेशातील कोणी व्यक्ती आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही संपर्क प्रस्थापित करत आहोत."












Click it and Unblock the Notifications