Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुनीता विल्यम्सला अंतराळातून परतण्यास उजाडणार पुढील वर्ष! पण येणार कशी घ्या जाणून

NASA Sunita Williams and Barry Wilmore : नासाचे आंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर पृथ्वीवर कधी परतणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे मात्र सुनीता विल्यम्सच्या परतण्याला पुढील वर्ष उजाडणार आहे. भारतीय वंशाच्या आंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी गेल्या कित्येक महिन्यांपासून अवकाशात अडकून पडले आहेत.

नासाच्या अधिकृत घोषणेनुसार आता सुनिता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर बोईंग स्टारलाईनर ऐवजी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत.

NASA astronauts Sunita Williams and Barry Wilmore will arrive on Earth in next year February

Crew-9 च्या माध्यमातून परतणार

नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर फेब्रुवारीपर्यंत Crew-9 च्या माध्यमातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परततील. बोईंग स्टारलाइनरमधील हेलियम गळती आणि थ्रस्टरमधील खराबीमुळे सुनीता विल्यम्स यांच्या परत येण्यास विलंब होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, SpaceX चे Crew-9 मिशन सप्टेंबरच्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकते. याआधी चार अंतराळवीर त्यात जाणार होते, मात्र आता दोनच लोक यात जाणार आहेत. दोन जागा रिक्त राहतील. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर देखील फेब्रुवारीमध्ये त्यांच्या नियोजित परतीच्या वेळी त्याच स्टेशनवरुन परततील.

एका आठवड्यात येणार होते परत

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन महिन्यांपूर्वी 5 जून रोजी अंतराळवीरात भरारी घेतली आहे. दोन्ही बोईंगच्या स्टारलाइनरच्या माध्यमातून रवाना झाले होते. दोन्ही अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवरुन एका आठवड्यात परत येणार होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळं ते परत येऊ शकले नाही. दोघं अद्यापही अंतराळात फसलेले आहेत.

..यामुळे सुनिता आणि विल्मोर यांना अंतराळात पाठविले

सुनीता आणि बुश विल्मोर बोइंग आणि नासाच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर पाठवण्यात आले. सुनीता या यानाच्या पायलट होत्या तर बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये 8 दिवस राहून दोघेही पृथ्वीवर परतणार होते.

प्रक्षेपणाच्या वेळी, बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटीचे अध्यक्ष आणि सीईओ टेड कोलबर्ट यांनी याला अंतराळ संशोधनाच्या नवीन युगाची उत्तम सुरुवात म्हटले. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाण्याची आणि त्यांना परत आणण्याची अंतराळयानाची क्षमता सिद्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+