Video म्यानमारमध्ये पुन्हा 5.1 तीव्रतेचा भुकंप; 1000 मृत्यू, 2400जखमी; 'या' बाळाचा व्हिडीओ नक्की पहा
म्यानमारसह आसपासच्या पाच देशांना शुक्रवारी भुकंपाचे धक्के बसले. त्यानंतर आज शनिवारी दुसऱ्या दिवशी म्यानमारमध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के बसले. शनिवारी दुपारी ३:३० वाजता म्यानमारमध्ये ५.१ तीव्रतेचा भुकंप मोजण्यात आला. गेल्या दोन दिवसांत ५ पेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप झाले आहेत. एकीकडे भुकंप होत असताना, दुसरीकडे त्याच वेळी एका गर्भवतीला दवाखान्यात घेऊन जाताना वाटेतच तिने एका बाळाच्या दिलेल्या जन्माचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दोन दिवसांत तीन भुकंप
शुक्रवारी झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो. ही भीती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने व्यक्त केली आहे. भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले. काही वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्करी सरकारने मृतांची संख्या १,००२ वर पोहोचल्याचे म्हटले आहे, तर २,४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक ३० मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.
आज पुन्हा भुकंप
शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये गेल्या २०० वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या ६ राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आज शनिवारी ३.३० वाजता म्यानमारमध्ये पुन्हा भुकंप झाला. हा भुकंप ५.१ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपामुळेही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
भारताकडून ८० कर्मचारी रवाना
भूकंपानंतर भारताने १५ टन मदत साहित्य आणि ८० एनडीआरएफ बचाव कर्मचाऱ्यांची टीम म्यानमारला पाठवली आहे. त्याला 'ऑपरेशन ब्रह्मा' असे नाव देण्यात आले आहे.
त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार पीपल्स गव्हर्नमेंटचे प्रमुख जनरल मिन आंग ह्लाईंग यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले की, जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून भारत या कठीण काळात म्यानमारच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे.












Click it and Unblock the Notifications