Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एका आठवड्यातच दुस-यांदा म्यानमारमध्ये 5.6 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के

Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये शुक्रवारी विनाशकारी भूकंपात 3,000 लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आज पुन्हा एकदा भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. म्यानमारच्या दक्षिण किनाऱ्याजवळ 5.6 तीव्रतेचा आज भूकंप झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली झाला होता. या विनाशकारी भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर काही दिवसांतच हा भूकंप आला आहे, ज्यामुळे या प्रदेशातील मदतकार्यावर आणखी ताण आला आहे.

या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता तीन हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर साडे चार हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. या भूकंपात इमारती कोसळल्या आहेत. तसेच पूल कोसळले आणि रस्ते खराब झाले. अधिकृत मृतांची संख्या 3003 वर पोहोचली आहे तर 4,500 हून अधिक जखमी झाले आहेत.

myanmar earthquake

स्थानिक रिपोर्टनुसार प्रत्यक्ष आकडेवारी जास्त असू शकते. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार या आपत्तीमुळे म्यानमारमध्ये आधीच गंभीर मानवीय संकट निर्माण झाले आहे. जिथे भूकंप होण्यापूर्वीच 30 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले होते आणि जवळजवळ 20 दशलक्ष लोकांना मदतीची आवश्यकता आहे. या भागातील बचावकार्य अद्यापही थांबलेले नाही. या ठिकाणी मदत कार्याची मोठी गरज असल्याचे देखील सांगितले जात आहे.

म्यानमारच्या लोकांना मदतीची गरज

यूएन ऑफिस फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स (ओसीएचए) ने म्हटले आहे की लोकांना स्वच्छ पाणी, अन्न आणि औषधांची तातडीची गरज आहे. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा सतत शोध घेत आहेत आणि शक्य तितकी मदत देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आव्हान असे आहे की या विनाशाच्या वातावरणात मदतकार्य सुरळीतपणे चालवणे खूप कठीण होत चालले आहे. म्यानमारच्या लोकांसाठी हा खूप कठीण काळ आहे आणि बाधित भागात मदत कार्य जलद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचे आवाहन केले जात आहे.

10 हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त

आयआरसीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, भूकंपाच्या धक्क्यानंतर, भीतीमुळे लोक आता रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत झोपत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुष्टी केली आहे की मध्य आणि वायव्य म्यानमारमधील 10,000 हून अधिक इमारती एकतर कोसळल्या आहेत किंवा कोसळण्याच्या मार्गावर आहेत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने असेही आवाहन केले की प्रभावित भागात, विशेषतः जिथे नियंत्रण कठीण आहे, तेथे निर्बंधांशिवाय मानवतावादी मदत पोहोचवावी.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+