काय सांगता..? असाही देश आहे जेथे मुस्लिमांना आहे बंदी; नियम मोडल्यास थेट मृत्यूदंड
सध्या बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार सुरु आहेत. कट्टरपंथिय देशाकडून तेथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार होण्याच्या घटना जगातील अनेक देशात घडत असतात. मात्र जगात असाही एक देश आहे, जेथे मुस्लिम बांधवांच्या प्रवेशावर व इस्लामविषयीच्या चर्चेवर पू्र्णपणे बंदी आहे. त्या देशात चक्क तीन हजार मुस्लिम समाज असूनही, त्यांना नमाज पडण्यासाठी साधी मशीदही नाही. तुम्हाला सांगूनही हे खरे वाटणार नाही, पण जगात असाही एक देश आहे. त्याच देशाबद्दल आज आपण जाणून घेऊयात...

उत्तर कोरियात मुस्लिमांना बंदी
उत्तर कोरिया हा देश हुकूमशहा किम जोंग-उनमुळे चर्चेत असतो. किंग जोंग हे युनायटेड स्टेट्स आणि पाश्चात्य देशांना शत्रू मानतात. या देशाची लोकसंख्या 2.6 कोटी आहे. मात्र तरीही या देशाची लष्करी शक्ती ही इतरांच्या तुलनेत खूप मोठी आहे. या देशात इस्लामचे पालन करण्यास कठोर प्रतिबंधित घालण्यात आले आहेत. इस्लाम धर्माचे पालन करण्यास तसेच या देशात नव्याने मुस्लिम समाजाच्या प्रवेशासही बंदी आहे. विशेष म्हणजे या देशाने हा कायदाच बनवला आहे.
तर होते मृत्यूदंडाची शिक्षा
उत्तर कोरियामध्ये सुमारे 3,000 मुस्लिम राहतात मात्र तेथे मशिदी नाहीत. इस्लामबद्दल कोणत्याही प्रकारे बोलण्यासही या देशात बंदी आहे. नियम मोडला तर अर्थातच हुकूमशहा किम जोंग-उनकडून शिक्षा सुनावण्यात येते. नियम मोडल्यास येथे मृत्यदंडाचीही शिक्षा दिली जाते. उत्तर कोरियामध्ये इस्लामबद्दल कोणतीही चर्चा झाल्यास किंवा केल्यास त्या व्यक्तीला थेट मृत्यूलाही सामोर जावं लागू शकतं, असंही काही मिडिया रिपोर्टचं म्हणणं आहे.
इतर धर्मालाही लावले आहेत नियम
या देशाची बहुसंख्य लोकसंख्या ही कोरियन शमानिझम आणि चॉन्ग्रिओनिझम आहे. हा देश पारंपारिक विचारसरणीचे पालन करतो. किम जोंग-उनच्या सरकारद्वारे येथे त्यांच्या धर्माचेही नियम बनविण्यात आले आहेत. या देशात मुस्लिमांप्रमाणे बौद्ध आणि ख्रिश्चन धर्माचे अनुयायीही आहेत. मात्र त्यांनाही काही नियम घालण्यात आले आहेत. उत्तर कोरिया हा नास्तिक देश मानला जातो. जो तेथील नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्यास परवानगी आहे पण या सर्वांसाठी काही नियम बनविण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications