Tahawwur Rana:मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण; हे आहेत त्याच्यावर आरोप
Mumbai attack accused Tahawwur Rana : 26/11- 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण होत असून तो आता भारतातील दिल्ली किंवा मुंबईतील तुरुंगात ठेवले जाणार आहे.
तत्पूर्वी अमेरिकेत "सर्व कायदेशीर मार्ग संपल्यानंतर त्याचे अपिल फेटाळण्यात आले. त्यामुळे आता राणाला भारतात आणले जात आहे.

आपल्यावरील आरोपासंदर्भात राणाने अमेरिकेतील सर्व कायदेशीर मार्गांचा वापर केला, पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्याचे अपील फेटाळले होते, म्हणून त्याला भारतीय अधिकाऱ्यांसमोर शरण येण्याची व्यवस्था करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने राणाची पुनर्विचार याचिका फेटाळली
21 जानेवारी रोजी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली, ज्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला.प्रत्यार्पणासाठी भारत अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यापूर्वी सांगितले होते की, "मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना भारताकडे लवकर प्रत्यार्पण करण्यासाठी प्रक्रियात्मक मुद्द्यांवर आम्ही अमेरिकेसोबत काम करत आहोत."
अजित डोवाल यांच्या मार्गदर्शनात प्रत्यार्पण
बातम्यांनुसार, भारत सरकारने तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोहाल यांच्या मार्गदर्शनात तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण केले जात आहे. तहव्वूरला आता दिल्ली किंवा मुंबईतील तुरुंगात ठेवले जाऊ शकते.
कोण आहे तहव्वूर राणा?
- कॅप्टन तहव्वुर हुसेन राणा याचा जन्म 12 जानेवारी 1961 साली झाला. तो एक पाकिस्तानी माजी लष्करी डॉक्टर आहे, ज्यांने पाकिस्तान सैन्यात सेवा बजावली होती.
- नागरिकत्व मिळाल्यानंतर तो कॅनडाला गेला आणि इमिग्रेशन सेवा व्यवसायी बनला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आदेशात राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला.
- 2011 मध्ये, त्याला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला पाठिंबा देण्याबद्दल आणि डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स-पोस्टेनवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.
- 17 जानेवारी 2013 रोजी त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
- 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि भारताने फरार घोषित केलेल्या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यापारी तहव्वुर राणा यांचा जामीन अर्ज अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावला होता, आता त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications