मॉस्कोत बॉम्बस्फोट; रशियाचे न्यूक्लियर चीफ ठार, पुतिन यांना मोठा धक्का
Moscow Bomb Blast : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात देशाच्या अणु संरक्षण दलाचे प्रमुख ठार झाले आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब लपविण्यात आला होता. याचा मोठा स्फोट झाल्याने न्यूक्लिअर विभागाचे प्रमुख यात मारले गेले, असे रशियाच्या तपास समितीच्या वतीने सांगण्यात आले.
रेडिओलॉजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल डिफेन्स (RCHBD) चे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांना मंगळवारी रियाझान्स्की प्रॉस्पेक्टवरील अपार्टमेंट इमारतीबाहेर ठार करण्यात आले.
तपास समितीने सांगितले की, रशियन फेडरेशनच्या सशस्त्र दलाच्या रेडिएशन, केमिकल आणि बायोलॉजिकल सिक्युरिटी फोर्सचे प्रमुख, इगोर किरिलोव्ह आणि त्यांच्या सहाय्यकाची हत्या करण्यात आली आहे. रशियन टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये इमारतीचे कोसळलेले प्रवेशद्वार आणि त्यात रक्ताने माखलेले दोन मृतदेह दिसून आले आहेत.

पुतिन यांना सर्वात मोठा धक्का
घटनास्थळावरील रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या फुटेजमध्ये पोलिसांचा घेरा दिसला. रशियाचे RKHBZ म्हणून ओळखले जाते, हे विशेष फोर्स आहेत जे किरणोत्सर्गी, रासायनिक आणि जैविक दूषित होण्याच्या परिस्थितीत कार्य करतात. किरिलोव्ह यांना एप्रिल 2017 मध्ये न्यूक्लियर फोर्सेसचे प्रमुख बनवण्यात आले. ते रशियाच्या रेडिएशन, रासायनिक आणि जैविक शस्त्रे विभागाचे प्रमुख होते. त्यांचा मृत्यू झाल्याने हा सर्वात मोठा पुतिन यांना धक्का मानला जात आहे.
उपसभापती म्हणाले- हत्येचा बदला घेतला जाईल
किरिलोव्ह यांच्या हत्येचा तपास सुरू केल्याचे रशियाच्या तपास संस्थेने एक निवेदन जारी केले आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, स्फोटासाठी 200 ग्रॅम टीएनटीचा वापर करण्यात आला होता. किरिलोव्हच्या मृत्यूनंतर रशियाच्या संसदेच्या उपसभापतींनी त्यांच्या हत्येचा नक्कीच बदला घेतला जाईल असे म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications