सणउत्सव साजरा करणाऱ्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार; 12 मृत, 20 जण जखमी

मेक्सिकोतील ग्वानाजुआटो राज्यातील इलापुआटो शहरात सेंट जॉन द बॅपटिस्ट या धार्मिक सणाच्या उत्सवात मोठी दुर्घटना घडली. रस्त्यावर पारंपरिक नृत्य व गाण्याच्या जल्लोषात रंगलेली गर्दी अचानक गोळीबाराच्या आवाजाने हादरली. या थरारक हल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू झाला असून, किमान 20 जण जखमी झाले आहेत.

Mexico shooting 2025

गोळीबार इतका अचानक आणि भीषण होता की काही क्षणांतच परिसरात दहशत पसरली.जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, मृतांमध्ये एक 17 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.

दुसऱ्या महिन्यात दुसरी हल्ल्याची घटना

ही दुर्दैवी घटना अलीकडच्या काळातील दुसऱ्या मोठ्या हिंसाचाराची पुनरावृत्ती आहे. काही आठवड्यांपूर्वी, सॅन बार्टोलो डी बॅरिओस परिसरातील एका कॅथोलिक धार्मिक कार्यक्रमात गोळीबार झाला होता, ज्यात 7 जणांनी प्राण गमावले होते.

ग्वानाजुआटो: मेक्सिकोतील सर्वाधिक हिंसक राज्यांपैकी एक

ग्वानाजुआटो हे राज्य सध्या मेक्सिकोतील अत्यंत अस्थिर आणि हिंसक प्रदेशांमध्ये गणले जाते. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष विशेषतः सांता रोसा डी लिमा टोळी आणि जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल यांच्यातील वर्चस्वाच्या झगड्यामुळे या भागात हिंसाचार वाढत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या 5 महिन्यांत ग्वानाजुआटोमध्ये तब्बल 1,435 खून नोंदवले गेले आहेत. हे प्रमाण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे, जे या हिंसेचे गांभीर्य अधोरेखित करते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+