Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जगातील या 3 देशात अंधार! वीज गुल; Internet, विमान, रेल्वेसेवा ठप्प, शस्त्रक्रिया थांबल्या! कारण काय?

Massive power outages in France Spain Portugal : ऐन उन्हाळ्यात साधी पाच मिनिटं लाईट गेली तर माणूस घामाघुम होतं अशातच जर चक्क एखाद्या देशाची लाईट गेली तर.. कल्पना करवत नाही, पण हा प्रकार युरोपमध्ये आज 28 एप्रिल 2025 रोजी घडला आहे.

स्पेन, पोर्तुगालसह जगातील 3 देशाची वीजच गुल झाली आहे. यामुळे या देशातील सर्व गोष्टी हळूहळू ठप्प झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल येथे वीज गुल झाली आहे. दरम्यान स्थानिक मीडियांच्या वृत्तानुसार, प्रभावित शहरांमध्ये मैड्रि़ड, बार्सिलोना, लिस्बन, सेविले आदी प्रमुख औद्यागिक केंद्रांचा समावेश आहे.

Massive power outages in France Spain Portugal

अनेक ठिकाणी मेट्रो, विमानसेवेवर परिणाम

स्थानिक मीडियाकडून वृत्त देण्यात आले की, वीज सेवा खंडीत झाल्याने मेड्रिड शहकात वाहतूक कोंडी झाली आहे तर विमानसेवेवर परिणाम झाला असून मेट्रोलाही फटका बसला आहे. तसेच अनेक रेल्वेस्थानकेही अंधारात आहेत. विशेषतः चालती लिफ्टही बंद झाल्या असून पुर्ण देशात अंधार पसरलेला आहे.

विजेचा तुटवटा की मुद्दाम केलेले कृत्य?

या देशातील शहरांची वीज गुल झाल्यानंतर आता चर्चा होत आहे की, हा विजेचा तुटवडा आहे का अथवा झालेली चूक असेल की, जाणून बुजून केलेले कृत्य यासंबंधी अजून ठोस माहिती उपलब्ध नाही पण टीव्ही 9 हिंदीने त्यांच्या वृत्तात म्हटले की, स्पेनच्या वीज ग्रीड व्यवस्थापक कंपनी रेड इलेक्ट्रिकलने या संदर्भात आपले म्हणणे मांडले आहे. हळू-हळू दक्षिण स्पेनमध्ये विज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. ग्रॅज्युअल एनर्जीजेशन प्रक्रियेनुसार केले जात असून पाॅवर प्लँटच्या जनरेटरला पुन्हा ग्रीडशी जोडले जात आहे.

जनरेटवर भागवत आहेत देशातील वीजपुरवठा

ज्या देशात वीजपुरवठा खंडीत झालेला आहे तेथे आता जनरेटरवर वीज पुरवठा तात्पुरता सुरु आहे. यामध्ये रुग्णालय, आणि पोर्तुगालच्या विमानतळावर जनरेटर वापरले जात आहे. अशातच तो कधीही बंद पडू शकतो.

ऑपरेशन्सवर परिणाम, वैद्यकीय क्षेत्राला फटका

वीज बंद झाल्याचा मोठा फटका वैद्यकीय क्षेत्राला बसला आहे. पोर्तुगालमधील मिसेरिकार्डीया रुग्णालयातील सर्व सर्जरी रद्द करण्यात आल्या असून अर्धवट असलेल्या सर्जरी जनरेटरच्या माध्यमातून पुर्ण केल्या जात आहेत, वैद्यकीय क्षेत्राला वीज खंडीत झाल्याचा मोठा फटका बसला आहे.

वीज खंडित होण्याचे कारण काय?

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. स्थानिक मीडियानुसार, युरोपियन पॉवर ग्रिडमधील समस्यांमुळे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्पातील राष्ट्रीय नेटवर्कवर परिणाम झाला आहे. तर नैऋत्य फ्रान्समधील अलारिक पर्वतावर लागलेल्या आगीमुळे पेर्पिग्नन आणि पूर्व नारबोन दरम्यान उच्च-व्होल्टेज पॉवर केबल नष्ट झाली असे म्हटले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+