Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'Mark Zuckerberg: मेटा'ला Whatsapp आणि Instagram विकावे लागणार का? मार्क झुकेरबर्गच्या अडचणीत वाढ!

Mark Zuckerberg's troubles increase : फेसबूकचा उद्गाता मार्क झुकेरबर्ग सध्या त्याच्या एका खटल्यामुळे संकटात आहे. त्याची कंपनी मेटावर US कॉम्पिटिशन एंड कंज्यूमर वॉच डॉगचा आरोप आहे. यादरम्यान आता Meta पर एंटीट्रस्ट ट्रायल सुरु झाली आहे, ह्या खटल्याचा निकाल जर मेटाविरुद्ध गेला तर मार्क झुकेरबर्गला त्याचे व्हाॅट्सअॅप आणि इन्स्ट्राग्राम विकावे लागणार आहे असा अनुमान आता काढला जात आहे.

काय आहे US कॉम्पिटिशन एंड कंज्यूमर वॉच डॉग आणि आरोप?

मेटावर आरोप ठेवण्यात आला आहे की, त्यांनी US कॉम्पिटिशन एंड कंज्यूमर वॉच डॉग केला आहे. म्हणजेच बाजारातील प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी 2012 मध्ये Instagram 1 बिलियन डाॅलरला आणि 2014 मध्ये Whatsapp 22 बिलियन डाॅलरला खरेदी केले होते.

Mark Zuckerberg                                                                                                               Whatsapp           Instagram

एफटीसी अर्थात Federal Trade Commission ने मेटाला अनुक्रमे 2012 आणि 2014 ला Instagram आणि Whatsapp खरेदी करण्याची परवानगी दिली होती. या व्यवहारानंतर काय परिणाम होतात याचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी फेडर ट्रेड कमीशनवर असते आता मेटावर खटला एफटीसीला दाखल करावा लागला आहे.

निकालच सांगेल Instagram आणि Whatsapp झुकेरबर्गकडे राहील का?

आता एफटीसीने खटला दाखल केल्यानंतर हे प्रकरण बोर्डावर आले आहे त्यामुळे या खटल्यात काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे, जर मेटाच्या बाजूने निर्णय आला तर मार्क झुकेरबर्गवरील मोठे संकट टळणार आहे पण जर मेटाच्या विरोधात निर्णय़ गेला तर झुकेरबर्गला Instagram आणि Whatsapp विकावे लागू शकते असे नवभारत टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

काय सांगतो एंट्रीट्रस्ट कायदा?

एंटीट्रस्ट कायद्यातील तरतुदीनुसार, स्पर्धा संपवून बाजारात एकाधिकारशाही ठेवता येणार नाही जर ती ठेवली गेली तर तो कायदेशीर गुन्हा आहे.

काय केली होती झुकेरबर्गने चूक?

आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी, एफटीसीने न्यायालयात एक ईमेल दाखवला आहे. यामध्ये झुकरबर्गने नमूद केले होते की स्पर्धा करण्यापेक्षा खरेदी करणे चांगले आहे. एटीसी आता हे सिद्ध करण्याच्या तयारीत आहे की, बाजारातील प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी मेटाचा प्रयत्न होता आणि यासंबंधी अमेरिकेत कायदे खूप कडक आहेत.

झुकेरबर्गने कशी केली फेसबूकची सुरूवात?

मार्क झुकरबर्ग शालेय जीवनापासूनच संगणक आणि प्रोग्रामिंगमध्ये निष्णात बनला होता. त्याने 4 फेब्रुवारी 2004 रोजी त्यांच्या हार्वर्ड डॉर्म रूममधून फेसबुक सुरू केले. Phillips Exeter Academy मध्ये असताना त्याला Facebook ची कल्पना सुचली, तिथे अनेक महाविद्यालये आणि शाळांप्रमाणेच, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या हेडशॉट फोटोंसह वार्षिक विद्यार्थी निर्देशिका प्रकाशित करण्याच्या दीर्घकालीन परंपरेशी तो परिचित होता.

कॉलेजमध्ये झुकरबर्गच्या फेसबुक "हार्वर्ड थिंग" ची सुरुवात होताच, झुकरबर्गने फेसबुकचा इतर शाळांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा रूममेट डस्टिन मॉस्कोविट्झचा पाठिंबा त्याला मिळाला. त्याने प्रथम स्टॅनफोर्ड, डार्टमाउथ, कोलंबिया, कॉर्नेल आणि येल येथे फेसबूकचे जाळे पसरवले, हळूहळू हे जाळे जगात विस्तारले आज तो जगातील प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तीत गणला जातो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+