Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अंबानीपासून जैन, मेहतांपर्यंत... डोनाल्ड ट्र्म्प यांच्या उद्धाटन कार्यक्रमाला कोण-कोण उपस्थित होतं?

अमेरिकेच्या इतिहासासाठी आजचा दिवस मोठा आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ भारतासाठीही खूप महत्त्वाचा असणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून मंत्री जयशंकर व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित राहणार आहेत. मोदी यांनी ट्र्म्प यांच्यासाठी लिहलेलं खास पत्र घेऊन, जयशंकर या सोहळ्याला पोहोचले आहेत. या सोहळ्यासाठी भारतीत इतर महत्त्वाचे व्यक्तीही हजर राहणार आहेत.

Mukesh Ambani

अंबानी दाम्पत्य

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी या १८ जानेवारीलाच वॉशिंग्टन डीसी येथे गेले आहेत. अंबानी दाम्पत्य या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रीमंडळातील व्यक्ती तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या पंक्तीत अंबानी दाम्पत्याला जागा देण्यात आली आहे.

आशिष जैनही उपस्थित

या सोहळ्याला पुणे येथील रिअल इस्टेट फर्म कुंदन स्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक आशिष जैन हेही उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्यापूर्वी वॉशिंग्टन डीसी येथे एका खासगी रिसेप्शनला जैन उपस्थित होते. जैन यांनी राजकीय पटलावरही वेगळा ठसा उमटवला असल्याचे सांगितले जात आहे.

कल्पेश मेहता

ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक आणि ट्रम्प टाँवर्स प्रकल्पांसाठी परवानाधारक भारतीय भागिदार कल्पेश मेहताही या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित आहेत. ट्रम्प ऑर्गनायझेशनसोबत मेहता यांनी अनेक वर्षे काम केले आहे. ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर व एरिक ट्रम्प यांच्या सोबत भेटीचे छायाचित्र मेहता यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पंकज बन्सल

एम३एम डेव्हलपर्सचे संचालक पंकज बन्सल हे देखील वाशिंग्टनमध्ये शपथविधीच्या डिनरमध्ये सहभागी झाले आहेत. बन्सल हे भारतीय वंशाच्या व्यावसायिक नेत्यांमध्ये सहभागी झालेले दिसले.

सुंदर पिचाई

भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हेही उद्धाटनाला उपस्थित राहणार आहेत. गुगलने ट्रम्पच्या या सोहळ्याला १ दशलक्ष डाँलर देणगी दिली आहे. त्यामुळे सुंदर पिचाई या सोहळ्याला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपतींच्या उद्धाटन सोहळ्याला परदेशी नेते व पाहुणे उपस्थित राहणार आहेत. रात्री १०.३० वाजता हा शपथविधी सोहळा सुरु होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+