पाकिस्तानात प्रवासी व्हॅनवर अतिरेक्यांकडून अंदाधुंद गोळीबार; 38 लोकांचा मृत्यू

Pakistan terrorist attack- पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रातांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वामधील डाऊन कुर्रम भागात प्रवासी व्हॅनवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि महिलांसह डझनभर लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. या हल्यात एक महिला व दोन मुलांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pakistan terrorist attack

नेमका कसा झाला हल्ला?

या हल्याची बातमी एएफपीच्या रिपोर्टमध्ये आली आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 32 जणांचा मृत्यू झाला. ही प्रवासी व्हॅन लोअर कुर्रममधील ओचुट काली आणि मंदुरी या भागातून जात होती. त्या ठिकाणी आधीच लपलेल्या अतिरेक्यांनी व्हॅन येताच त्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यानंतर व्हॅनमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली. प्रवाशांच्या आक्रोशाने हा परिसर हादरला. ही प्रवाशी व्हॅन पाराचिनारमधून पेशावर येथे जात होती. पाकिस्तानची वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तहसील मुख्यालय रुग्णालय अलिझाईचे अधिकारी डॉ. घायोर हुसैन यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

राष्ट्रपतींनी व्यक्त केला निषेध

या भयानक हल्ल्यात सुमारे 38 नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्लातील जखमींना तत्काळ जवळपासच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना तातडीने पेशावर येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तान प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी या हल्ल्यातील मृतकांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पीपल्स पार्टीनेही व्यक्त केला निषेध

पाकिस्तान पीपल्स पार्टीने निर्दोष प्रवाशांवर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही पीपल्स पार्टीने केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. पख्तूनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम असलम चौधरी यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एक महिला आणि दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेतली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+