Los Angeles Wildfires: लॉस एंजेलिसमध्ये आगीचं तांडव, 11 जणांचा मृत्यू 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान
Los Angeles Wildfires Explained: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहरातील भीषण आगीत आतापर्यंत किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत हजारो घरे आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे सुरु आहेत.
अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे, तपास अधिकारी एवढी विनाशकारी आग कशी लागली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉस एंजेलिसमधील आगीत लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे आणि अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे जळून खाक झाली आहेत.

लॉस एंजेलिसमधील आग किती धोकादायक ?
मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये लागलेली वणवा वेगाने पसरत असून 16,000 एकरपेक्षा जास्त जमीन आणि 1,000 हून अधिक इमारतींना त्यात वेढले गेले आहे. वेगाने पसरणाऱ्या आगींमुळे घरे आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. येथील स्थानिक रहिवाशांना त्यांची घरे सोडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनच्या मते, अमेरिकेत वीज पडणे हे आगीचे सर्वात सामान्य कारण असले तरी, तपासकर्त्यांनी सध्या वीज पडणे हे आगीचे कारण असल्याचे नाकारलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पॅलिसेड्स परिसरात किंवा ईटन आगीच्या आसपासच्या परिसरात वीज कोसळल्याचे वृत्त नाही. ही आग पूर्व लॉस एंजेलिस काउंटीमध्ये सुरू झाली. आणि शेकडो घरांना आगीने वेढून टाकलं आहे.
लॉस एंजेलिसमध्ये आग कुठे लागली आहे?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जरी ईटन परिसरातील आग अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. लॉस एंजेलिसमधील केनेथ आणि व्हेंचुरा काउंटीमधील सुमारे 960 एकर क्षेत्राला या वणव्याने गंभीर नुकसान पोहोचवले आहे. त्याच वेळी केनेथ परिसरातील 35 टक्के आग आटोक्यात आली आहे. त्याच वेळी हर्स्ट आणि लिडियामध्ये सुमारे 1200 एकर क्षेत्राला आग लागली आहे, ज्यापैकी हर्स्टमधील 37 टक्के आग विझवण्यात आली आहे, तर लिडियामधील 75 टक्के आग आटोक्यात आली आहे.दरम्यान सर्वात मोठी समस्या म्हणजे ताशी 160 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहणारे जोरदार वारे, ज्यामुळे हेलिकॉप्टरव्दारे रेस्क्यू ऑपरेशन करणे खूप कठीण होतं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लॉस एंजेलिसमधील आगीला मोठी आपत्ती घोषित केली आहे. स्थानिक गव्हर्नर आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 'जे काही करावे लागेल ते करण्याचे' निर्देश त्यांनी दिले आहेत. परंतु, या सर्वांमध्ये लॉस एंजेलिसची स्थिती बिकट होत चालली आहे. तसेच आतापर्यंत या आगीत 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे वृत्त आहे.












Click it and Unblock the Notifications