नेतन्याहू यांच्या घराजवळ पडले लेबनॉनचे ड्रोन; कडक सुरक्षेला छेद, सुरक्षा दलाचा दुजोरा!
हिजबुल्लाह अन् लेबनॉनमधील युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. एकमेकांच्या जीवावर हे लोक उठलेले आहेत. अशातच आता आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इस्त्रायली इमारतीवर ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यातून पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराला टारगेट करण्याचा प्रयत्न झाला आहे. इस्त्रायली सुरक्षा दलांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून ड्रोन मोकळ्या जागेत पाडण्यात आले असून यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलमधील हैफा सीझेरिया भागात हा ड्रोन करण्यात आला. इस्त्रायली सुरक्षा दलांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, हे ड्रोन मोकळ्या जागेत पडले असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षेला छेद देण्यात यश
आयडीएफच्या म्हणण्यांनुसार, शनिवारी आज सकाळी हैफा परिसरात लेबनॉनमधून डागलेल्या रॉकेटमुळे चेतावणीचे सायरन वाजले. इस्रायली प्रसारमाध्यमांनी देखील सांगितले की, दक्षिणी हैफा येथील सीझेरिया भागात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ ड्रोनचा स्फोट झाला. हे ड्रोन लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम होते. इस्त्रायली सुरक्षा दलांनी कबूल केले की ड्रोन हल्ला रोखण्यात आपली हवाई संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली, ज्यामुळे हा हल्ला झाला. सुरक्षेला छेद देऊन हा हल्ला करण्यात आला. दुसरीकडे सुरक्षा दलांनी देखील ही एक चूक मान्य केली आहे. कारण हैफाच्या चारही बाजूने शोधत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरच्या शेजारी एक ड्रोन उडाला.
तेल अवीवमध्ये वाजले सायरन
इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार,तीन ड्रोन लेबनॉनहून हैफाच्या दिशेने आले, त्यापैकी फक्त दोनचा शोधण्यात व त्यांना थांबवण्यात यश आले. तिसऱ्या ड्रोनने सीझेरियातील एका इमारतीवर अचूक हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी पुष्टी केली की स्फोट खूप जोरदार होता. ड्रोन लेबनॉनपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावरून उड्डाण केले आणि थेट सीझेरियामधील एका इमारतीला धडकले, ज्याचे काही भाग शेजारच्या इमारतीवर देखील पडले. ड्रोन इस्रायली हवाई हद्दीत घुसल्यानंतर उत्तर तेल अवीवमधील ग्लिलॉट सेटलमेंटमधील लष्करी तळांवर सायरन वाजू लागले. ड्रोन हल्ला करण्यापूर्वी एक तास इमारतीच्या वरती घिरट्या घालत होते, असा दावा इस्त्रायली सैन्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications