Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ना घर का, ना घाट का! फरार ललित मोदीचे वानाआतूचे नागरिकत्व रद्द, PM जोथम यांचे पासपोर्ट रद्दचे आदेश

IPL founder Lalit Modi passport news : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी संस्थापक आणि भारताचे फरार ललित मोदीच्या अडचणी वाढल्या आहेत. अलिकडेच त्याने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केला होता. ललित मोदी यांनी त्याचा पासपोर्ट सोडून दिला होता आणि वानुआतू या छोट्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. पण आता त्याच देशाचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ललित मोदींना जोरदार धक्का दिला आहे.

वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी पुरेशा पुराव्याअभावी इंटरपोल अलर्टसाठी भारतीय अधिकाऱ्यांची विनंती नाकारल्याचे कारण दिले आहे. "मी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीचा वानुआतू पासपोर्ट रद्द करण्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत," असे नापट यांनी एका निवेदनात स्पष्ट केले आहे.

Lalit Modi Passport Latest News

वानुआतूने ललित मोदीचा पासपोर्ट का रद्द केला?

वानुआतूचे पंतप्रधान जोथम नापट म्हणाले की, पार्श्वभूमी तपासणीत कोणताही गुन्हेगारी दोष आढळला नसला तरी, त्यांना ललित मोदीच्या कारनाम्यांची पूर्वी माहिती नव्हती. पंतप्रधान जोथम नापट म्हणाले, "गेल्या 24 तासांत मला कळवण्यात आले आहे की इंटरपोलने न्यायालयीन पुराव्याअभावी भारत सरकारने ललित मोदींबाबत पाठवलेला अलर्ट दोनदा नाकारला होता.

पीएम नापट यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरी त्यांच्या अर्जादरम्यान केलेल्या इंटरपोल तपासणीसह सर्व मानक पार्श्वभूमी तपासणीत कोणताही गुन्हेगारी दोष आढळला नाही, तरी गेल्या 24 तासांत मला कळले आहे की इंटरपोलने न्यायालयीन पुराव्याअभावी ललित मोदींवर अलर्ट नोटीस जारी करण्याची भारतीय अधिकाऱ्यांची विनंती दोनदा नाकारली आहे. अशा कोणत्याही अलर्टमुळे ललित मोदींचा नागरिकत्व अर्ज फेटाळला गेला असता.

ललित मोदी भारतातून का पळून गेले?

  • ललित मोदी हे 2005 ते 2009 पर्यंत राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2008 मध्ये त्यांनी आयपीएल सुरू केले. बीसीसीआयने त्यांना आयपीएलचे अध्यक्ष आणि आयुक्त बनवले.
  • 2010 मध्ये ललित यांच्यावर आयपीएलमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला. ललित यांनी मॉरिशस कंपनी वर्ल्ड स्पोर्ट्सला 425 कोटी रुपयांचा आयपीएल करार दिला होता.
  • मोदींवर 125 कोटी रुपये कमिशन घेतल्याचा आरोप होता. दोन नवीन संघांच्या लिलावादरम्यान त्यांनी अन्याय्य पद्धतींचा अवलंब केल्याचेही सांगण्यात आले.
  • 2010 मध्ये आयपीएलच्या तिसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयने ललित यांना लगेचच निलंबित केले. 2010 मध्येच अंडरवर्ल्डच्या धमक्यांमुळे ललित मोदी भारतातून लंडनला पळून गेले. ईडीने त्यांच्याविरुद्ध 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी केली. त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला.
  • 2011 मध्ये बीसीसीआयने अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली. तत्कालीन काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन हे त्याचे सदस्य होते.
  • 2012 मध्ये ललित मोदी म्हणाले की, त्यांनी 2009च्या आयपीएलसाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफला सीएसकेमध्ये आणण्यास श्रीनिवासन यांना मदत केली होती.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+