इंग्लंडमध्ये योगा क्लासमध्ये थरार! अल्पवयीन मुलाचा चाकूहल्ला, 2 मुलांचा मृत्यू, 9 जण जखमी
England knife attack : उत्तर इंग्लंडमधील एका गावात टेलर स्विफ्ट-थीम असलेल्या नृत्य क्लासमध्ये चाकू हल्ला करण्यात आला. या चाकू हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या वृत्तानुसार, चाकू हल्ल्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा सहभागी होता, त्याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.

फिल्मी स्टाईलने केला हल्ला
ज्यावेळी हल्ला झाला होता त्यावेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितले की, हा हल्ला फिल्मी स्टाईलने केला होता. मर्सीसाईड पोलिसांच्या चीफ कॉन्स्टेबल सेरेना केनेडी यांनी सांगितले की, जखमींपैकी सहा मुलांची प्रकृती गंभीर आहे आणि दोन प्रौढ देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
केनेडी म्हणाले की, हल्लेखोर शस्त्रास्त्रासह कॉम्प्लेक्स मधील योग क्लास मध्ये घुसले आणि त्यांनी मुलांवर सपासप वार केले, यावेळी त्यांना वाचवण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिक गेले होते ते देखील या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत.
सतरा वर्षीय मुलाला अटक
मर्सीसाइड पोलिसांनी म्हटले आहे की त्यांना लिव्हरपूलच्या उत्तरेकडील साउथपोर्टमध्ये चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळाली मिळाली त्यानंतर तातडीने स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:50 वाजता पोलिसांच्या टीम आणि आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळावरून 17 वर्षीय संशयित मुलाला हत्या आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
हा दहशतवादी हल्ला आहे का?
घटनेचा तपास तातडीने सुरू केला असून हा तपास सुरुवातीच्या टप्प्यात आहे त्यामुळे हल्ला करण्यामागचे कारण आणि हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती केनेडी यांनी दिली आहे. त्यानंतर म्हणाले की, काउंटर-टेररिझम पोलिस नॉर्थ वेस्टने तपासाला आपला पाठिंबा देऊ केला आहे.
या घटनेचा दहशतवादाशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते मात्र तरीही दहशतवादविरोधी पथकाने तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही दहशतवादी घटना आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
स्थानिक व्यापारी कॉलिन पॅरी हा या घटनेनंतर पोलिसांना माहिती देताना सांगितले की, हा हल्ला एखाद्या भयावह चित्रपटासारखा होता,तरुणींवर वार करण्यात आले होते. त्यामुळे त्या तरुणींचे पालक आक्रोश करत होते.असेही स्थानिक व्यापाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली.












Click it and Unblock the Notifications