Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

किम जोंग उन यांचा वारसदार ठरला! 13 वर्षांची मुलगी 'किम जू ऐ' सांभाळणार उत्तर कोरियाची धुरा?

Kim Jong Un daughter successor : उत्तर कोरियाच्या सत्तेचे गूढ नेहमीच जगासाठी कुतूहलाचा विषय राहिले आहे. मात्र, आता दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) ने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी आपल्या मुलीला, किम जू ऐ हिला भविष्यातील हुकूमशहा म्हणून तयार करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः तिच्या अलीकडील बीजिंग दौऱ्यामुळे या चर्चांना अधिकृत पुष्टी मिळाली आहे.

Kim Jong Un daughter successor

बीजिंग दौरा आणि 'नंबर 2' चे स्थान

काही महिन्यांपूर्वी किम जू ऐ आपल्या वडिलांसोबत चीनच्या दौऱ्यावर दिसली होती. तिचा हा पहिलाच परदेशी दौरा होता. बीजिंग रेल्वे स्थानकावर ज्या पद्धतीने तिला महत्त्व दिले गेले, त्यावरून ती केवळ किम जोंग यांची मुलगी नसून उत्तर कोरियातील 'नंबर 2' ची व्यक्ती आहे, असा संदेश जगाला देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, परदेश दौऱ्यावर सोबत नेणे हे तिला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्याचे पहिले पाऊल आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढती उपस्थिती

2022 मध्ये किम जू ऐ पहिल्यांदा जगासमोर आली होती. तेव्हापासून तिची उपस्थिती सातत्याने वाढत आहे.

क्षेपणास्त्र चाचणी: वडिलांसोबत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) प्रक्षेपणाच्या वेळी ती उपस्थित होती.

लष्करी कार्यक्रम : कोरियन पीपल्स आर्मीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात तिला विशेष महत्त्व दिले गेले.

राजकीय सहभाग : सरकारी धोरणांवर तिने मत व्यक्त केल्याचेही काही संकेत मिळाले आहेत, जे उत्तर कोरियाच्या परंपरेत वारसदाराशिवाय कोणालाही शक्य नाही.

50 वर्षांच्या परंपरेत मोठे बदल?

उत्तर कोरियात दर पाच वर्षांनी होणारी 'पक्ष परिषद' या महिन्यात पार पडणार आहे. या परिषदेत किम जू ऐ सहभागी होते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जर ती या परिषदेत अधिकृतपणे दिसली, तर तिच्या वारसदार असण्यावर शिक्कामोर्तब होईल. याच परिषदेत उत्तर कोरिया आगामी पाच वर्षांचे अण्वस्त्र धोरण आणि युद्धाची तयारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

किम जू ऐ बद्दल काही खास गोष्टी

  • शिक्षण : ती शाळेत न जाता घरीच शिक्षण घेते.
  • छंद : तिला घोडेस्वारी, पोहणे आणि स्कीइंगची विशेष आवड आहे.
  • ओळख : २०१३ मध्ये माजी बास्केटबॉल स्टार डेनिस रोडमन यांनी पहिल्यांदा तिच्या अस्तित्वाबद्दल जगाला सांगितले होते.

गोपनीयतेचे पडदा आणि तीन मुले

किम जोंग उन आपल्या कुटुंबाबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगतात. त्यांनी २०१२ पर्यंत आपली पत्नी री सोल जू हिलाही जगापासून लपवून ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, किम यांना तीन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा आणि एक धाकटे अपत्य अद्याप पडद्यामागेच आहे. मात्र, किम जू ऐ हीच सर्वाधिक चर्चेत आणि वडिलांच्या विश्वासातील मानली जात आहे.

दक्षिण कोरियाच्या खासदारांचे मत

दक्षिण कोरियाचे खासदार ली सोंग-क्वेन यांच्या मते, पूर्वी तिला केवळ प्रशिक्षण दिले जात असल्याचे वाटत होते, मात्र आता ती औपचारिक घोषणा होण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+