Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ज्योती मल्होत्रासारख्या गुप्तहेरांना पाकिस्तान किती पैसे देतो? हनीट्रॅप केल्यास मिळतात जास्त पैसे!

Jyoti Malhotra espionage case : हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आणि पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिची तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहे. चौकशीत काही खुलासेही होत आहेत. ज्योती मल्होत्राने किती पैसे कमावले ती युट्यूबद्वारे किती पैसे कमवायची हे समोर येत असतानाच आता पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय त्यांच्या गुप्तहेरांना किती पैसे देतो हे अनेकांना माहिती नाही.

ज्योती मल्होत्राचा माहिती पुरवल्याच्या प्रकरणात कितपत सहभाग आहे आणि तिला पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेकडून किती पैसे मिळाले याचाही तपास संवेदनशीलरित्या पोलिस करत आहेत. ज्योती मल्होत्रा 2020 पर्यंत नोकरी करत होती. ती एका खासगी कंपनीची कर्मचारी होती पण तिने नोकरी गमावल्यानंतर ती युट्यूबर बनली.

Jyoti Malhotra espionage case

युट्यूबच्या माध्यमातून ज्योती मल्होत्राने चांगला पैसा कमावला असे म्हटले जाते. तिची आलिशान जीवनशैली सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. युट्यूबर म्हणून काम करत असताना, ती पाकिस्तानी हेर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (इंटर-सर्व्हिस इंटेलिजेंस) यांच्या संपर्कात आल्याचा आरोप आहे आणि तिने संवेदनशील माहिती लीक करण्यास सुरुवात केली होती असेही म्हटले जात आहे.

आयएसआयला हेरगिरीसाठी किती पैसे मिळतात?

वनइ़ंडिया हिंदीनुसार, पाकिस्तान सरकार आयएसआयसाठी दरवर्षी जवळपास पाचशे कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद करते. या निधीचा वापर आयएसआय त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी करते यासह हेरांना पैसे देण्यासाठीही निधीचा वापर केला जातो. आयएसआय एजन्सी अधिकृतपणे सुमारे 4 हजार लोकांना रोजगार देते, पण काही खास गुप्तहेर जे अधिकृत कर्मचारी नाही अशांची संख्या एकत्रित केल्यास ती मोठी असू शकते.

महिला हेरांना हनीट्रॅपसाठी मिळतो सर्वाधिक पैसा

टेरर फायनान्सिंग इन काश्मीर सारखी पुस्तके लिहिणारे लेखक डॉ. अभिनव पंड्यांच्या एका माहितीचा संदर्भ वनइंडिया हिंदीने दिला. त्यानुसार, भारतीय सशस्त्र दलात तैनात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आणि त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढणाऱ्या महिला हेरांना आयएसआय सर्वाधिक पैसे देते. यासाठी त्यांना 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतात. लष्करी तळांचे स्थानाची संवेदनशील माहिती शेअर केल्यास 5 ते 10 हजार रुपये मिळू शकतात, तर त्यापेक्षा जास्त माहितीसाठी 20 हजार रुपये दिले मिळतात.

क्षेत्रानुसार आयएसआय गुप्तहेरांना पगार देते. आयएसआय गुप्तहेरांसाठी क्षेत्रानुसार पगाराची रचना वेगळी असते. थायलंड आणि म्यानमार सारख्या देशांना भारत आणि अमेरिका सारख्या देशांच्या तुलनेत कमी पैसे मिळतो. तिथे आयएसआय गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी जास्त पैसे खर्च करते. या पातळीवर पैशाचे वितरण आयएसआयच्या हेरगिरीच्या रचनेचे स्वरूप दर्शवते.

पाकिस्तान पैसा देत ही माहिती कशी कळते?

पाकिस्तान सरकारने किंवा आयएसआयने कधीही अधिकृतपणे देयकांची माहिती उघड केली नसली तरी, अटक केलेल्या हेरांकडून माहिती समोर आली आहे. त्यांच्या चौकशीतून ही माहिती उघड होत असते. फेब्रुवारीत पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये एका आयएसआय एजंटला अटक केली. पत्रकार परिषदेत एसएसपी अमृतसर ग्रामीण यांनी खुलासा केला की आयएसआय किरकोळ माहितीसाठी 5 हजार रुपये आणि मोठ्या किंवा संवेदनशील माहितीसाठी दहा रुपये देते.

2011 मधील दुसऱ्या एका प्रकरणात, पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडलेल्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने त्याच्या सेवेसाठी 3 कोटी रुपये घेतल्याचे उघड केले. या उदाहरणांवरून हे सिद्ध होते की पैसे हे गुप्तहेराच्या स्थितीवर आणि दिलेली माहिती किती संवेदनशील आहे यावर अवलंबून असतात.

ज्योती मल्होत्राला किती पैसे मिळाले असते?

आयएसआयने ज्योती मल्होत्राला किती पैसे दिले असतील हे स्पष्ट झालेले नाही. त्याच्या आयएसआयशी असलेल्या व्यवहारांची चौकशी अजूनही सुरू आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पाकिस्तानला कोणत्या प्रकारची माहिती पाठवली आहे आणि त्याची पातळी काय आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+