जागतिक राजकारणात भूकंप! जेफ्री एपस्टाईन 'सेक्स स्कँडल'च्या 95 हजार फाईल्स होणार सार्वजनिक

Jeffrey Epstein Sex Scandal Files : जगप्रसिद्ध आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या जेफ्री एपस्टाईन सेक्स स्कँडल प्रकरणातील सर्व गुप्त फाईल्स उद्या 19 डिसेंबर रोजी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाकडून जाहीर केल्या जाणार आहेत.

या फाईल्समध्ये हजारो पानांची कागदपत्रे, 95 हजार फोटो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या बँक रेकॉर्डचा समावेश असून, यामुळे जगभरातील अनेक बड्या नेत्यांचे आणि सेलिब्रिटींचे धाबे दणाणले आहेत.

Jeffrey Epstein Sex Scandal Files

फाईल्समध्ये नेमके काय असणार?

अमेरिकन सरकारने जाहीर केल्या जाणाऱ्या या फाईल्समध्ये एपस्टाईनने अल्पवयीन मुलींच्या तस्करीसाठी कोणाची मदत घेतली आणि हे जाळे इतकी वर्षे कसे चालले, याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असेल:

  • जेफ्री एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेलशी संबंधित सर्व कागदपत्रे.
  • हवाई प्रवास रेकॉर्ड : ज्यामध्ये एपस्टाईनच्या खासगी विमानातून प्रवास करणाऱ्या दिग्गजांची नावे असतील.
  • ९५,००० फोटो आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्स.
  • बँक रेकॉर्ड: आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती.
  • २०१९ मधील मृत्यूचे गूढ: एपस्टाईनच्या तुरुंगातील संशयास्पद मृत्यूशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे.

शक्तिशाली व्यक्तींची नावे चव्हाट्यावर येणार?

या प्रकरणाचे धागेदोरे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार रीड हॉफमन, अर्थशास्त्रज्ञ लॅरी समर्स आणि जेपी मॉर्गन चेस यांसारख्या दिग्गज संस्थांपर्यंत पोहोचलेले आहेत. या फाईल्स प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत सरकारला त्या सर्व राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करावी लागणार आहे, ज्यांचा संदर्भ या कागदपत्रांमध्ये आला आहे.

सरकार काय लपवू शकते?

जरी ट्रम्प प्रशासनाने सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आश्वासन दिले असले, तरी कायद्यानुसार काही माहिती राखून ठेवली जाऊ शकते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, केवळ प्रतिमा मलीन होईल म्हणून माहिती रोखता येत नाही, परंतु खालील ५ कारणांसाठी सरकार सूट घेऊ शकते.

१. पीडितांची ओळख: ज्या अल्पवयीन मुलींचे शोषण झाले, त्यांची ओळख पटवणारी माहिती.

२. बाल लैंगिक शोषण: अशा कृत्यांचे चित्रण करणारे साहित्य.

३. हिंसाचाराचे चित्रण: अमानवीय कृत्यांचे फोटो किंवा व्हिडिओ.

४. चालू तपास: जेपी मॉर्गन किंवा बिल क्लिंटन यांच्याशी संबंधित सुरू असलेल्या नवीन चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून काही भाग गोपनीय ठेवला जाऊ शकतो.

५. राष्ट्रीय सुरक्षा: परराष्ट्र धोरण किंवा गुप्तचर यंत्रणांशी संबंधित माहिती.

पारदर्शकतेचे आव्हान आणि विरोधकांचा संशय

ट्रम्प प्रशासनावर यापूर्वीही टीका झाली आहे कारण गेल्या वेळी प्रसिद्ध केलेली माहिती आधीच सार्वजनिक होती. आता ट्रम्प यांचे विरोधक असा संशय व्यक्त करत आहेत की, न्याय विभाग (DOJ) सुरू असलेल्या नवीन तपासाचा बहाणा करून आपल्या प्रभावशाली मित्रांची नावे लपवण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करू शकते. मॅनहॅटनमधील घरातून जप्त केलेले हजारो नग्न फोटो सार्वजनिक केले जाणार नाहीत, असे सीएनएनने म्हटले आहे.

आतापर्यंतचा प्रवास!

या वर्षाच्या सुरुवातीला काही कागदपत्रे आणि १२ डिसेंबर रोजी हाऊस ओव्हरसाईट कमिटीने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. मात्र, १९ डिसेंबरचे हे प्रकाशन सर्वाधिक व्यापक मानले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+