जपानमध्ये मोठ्या भूकंप आणि त्सुनामीचा इशारा, 3 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती,जगभरात खळबळ उडाली

नुकताच म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिलं आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. या धक्क्यातून लोक अजून सावरले नाहीत. तेव्हा जपानने एक नवीन इशारा देऊन जगभरात खळबळ उडवून दिली आहे.

जपानच्या सरकारी एजन्सीच्या रिपोर्टनुसार, जपानमध्ये येत्या काळात 'मेगा भूकंप' येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात विनाश होईल. एकाच झटक्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतात. समुद्रात एक भयानक त्सुनामी येईल आणि अनेक शहरे पाण्याखाली जाऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

Earthquake Japan

फोटो सौजन्य- फाईल फोटो (पीटीआय)

सरकारी एजन्सीच्या रिपोर्टनुसार, जपान सरकारने असा इशारा दिला आहे की, जर 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर 13 लाख लोक बेघर होतील. तसेच सुनामी आणि इमारती कोसळल्याने सुमारे 3 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो. जर असे झाले तर जपानच्या अर्थव्यवस्थेला 2 ट्रिलियन डॉलर्स (म्हणजे 171 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) नुकसान होऊ शकते.

जगात जपानमध्ये सर्वाधिक भूकंप होतात. सरकारच्या मते, पुढील काही वर्षांत नानकाई ट्रफ नावाच्या भूकंपीय क्षेत्रात 8 ते 9 तीव्रतेचा भूकंप होण्याची 80% शक्यता आहे. कॅबिनेट ऑफिसच्या अहवालात म्हटले आहे की, हा नवीन अंदाज पूर्वीच्या अंदाजित 214.2 ट्रिलियन येनपेक्षा खूपच जास्त आहे. रिपोर्टनुसार, जर या प्रदेशात 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर सुमारे 12.3 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवावे लागू शकते. जर हा भूकंप हिवाळ्याच्या रात्री झाला तर त्सुनामी आणि इमारती कोसळल्याने सुमारे 2.98 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नानकाई ट्रफ भूकंपाचे केंद्रबिंदू

नानकाई ट्रफ हा जपानच्या नैऋत्य पॅसिफिक किनाऱ्यावर स्थित 900 किलोमीटर लांबीचा प्रदेश आहे, जिथे फिलीपीन सी प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या प्रदेशात दर 100 ते 150 वर्षांनी एकदा मोठा भूकंप होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. गेल्या वर्षी जपानने पहिला मेगाअर्थकंपाचा इशारा जारी केला होता. त्यावेळी या प्रदेशाच्या किनाऱ्यावर 7.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता. नानकाई ट्रफमध्ये 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता वाढत असल्याचे हे संकेत आहेत.

2011 भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता

2011 मध्ये ईशान्य जपानमध्ये 9 तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यावेळी त्सुनामी आली आणि फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 15,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जर नानकाई ट्रफमध्ये या तीव्रतेचा भूकंप झाला तर त्याचा परिणाम खूपच विनाशकारी असू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+