जयशंकर काही वेळात डोनाल्ड ट्रम्प यांना देणार मोदींनी लिहीलेलं पत्र; नेमकं काय आहे त्यात?
अमेरिकेच्या इतिहासासाठी आजचा दिवस मोठा आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ भारतासाठीही खूप महत्त्वाचा असणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून मंत्री जयशंकर व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित राहणार आहेत. मोदी यांनी ट्र्म्प यांच्यासाठी लिहलेलं खास पत्र घेऊन, जयशंकर या सोहळ्याला पोहोचले आहेत.

जयशंकर होणार सहभागी
वॉशिंग्टन डीसीमध्ये आज डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा होत आहे. भारतीय वेळेनुसार तो रात्री १०.३० ला सुरु होईल. ट्र्म्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. या सोहळ्यात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास दूत म्हणून मंत्री जयशंकर हे गेले आहेत. मोदींनी त्यांच्याकडे खास पत्रही दिलं आहे. या पत्रात डोनाल्ड ट्र्म्प यांना खास शुभेच्छा दिल्याचे सांगितले जाते.
भारताने पाठवला खास प्रतिनिधी
भारताकडून विदेश मंत्री जयशंकर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी गेले आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये रक्षामंत्री राजनाथ सिंग हे नायजेरियाच्या राष्ट्रपतीच्या शपथविधाला गेले होते. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला गेले होते. गेल्यावर्षी परिवहन मंत्री नितीन गडकरी हे इराणच्या राष्ट्रपतीच्या शपथविधीला हजर राहिले होते.
ट्रम्प होणार ४७ वे राष्ट्रपती
डोनाल्ड ट्र्म्प यांचा शपथविधी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरु होईल. ट्र्म्प यांच्या शपथविधीपूर्वी उपराष्ट्रपती जेडी वेंस शपथ घेणार आहेत. त्यानंतर चीफ जस्टिस जाँन राँबर्ट्स हे ट्र्म्प यांना शपथ देणार आहेत. शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्र्म्प अमेरिकी जनतेला संबोधीत करणार आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्व जगाच्या नजरा लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications