Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिजबुल्लाच्या मुख्यालयावर इस्रायलचा जोरदार हवाई हल्ला, अनेक इमारती जमीनदोस्त

इस्रायलच्या संरक्षण दलांनी लेबनॉनवर आता हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील बेरूत येथे असलेल्या हिजबुल्लाच्या मुख्यालयाला लक्ष्य करून जोरदार हवाई हल्ले केले आहेत. रिपोर्टनुसार इस्रायली लष्कराचे टार्गेट हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाह आहे. दरम्यान रिपोर्टनुसार हिजबुल्लाचे महासचिव सुरक्षित आहेत.

इस्रायल हिजबुल्लाच्या दहशतवादी तळांना सतत लक्ष्य करत आहे आणि त्यांची शस्त्रे ज्या ठिकाणी लपवून ठेवली आहेत त्या ठिकाणी बॉम्बफेक केली जात आहे. इस्रायलचे सैन्य एकामागून एक हिजबुल्लाच्या कमांडरना ठार मारत आहेत.

700 लोकांना आपला जीव गमवावा लागला

लेबनॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे आतापर्यंत जवळपास 700 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Israeli airstrike on Hizbullah

कार्यकारी परिषदेचे प्रमुख ठार

हिजबुल्लाहच्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख हाशेम सफीद्दीन ठार झाल्याची माहिती आहे. यापूर्वी इस्त्रायली लष्कराने हिजबुल्लाहचा ड्रोन कमांडर मोहम्मद सरूरला ठार केले होते.

नेतान्याहू यांच्या भाषणानंतर हल्ले तीव्र झाले

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी यूएनजीसीमध्ये केलेल्या भाषणानंतर परिस्थिती आणखी चिघळली आहे. या भाषणानंतर बेरूतमध्ये सर्वात भीषण बॉम्बस्फोट झाले आहेत. या कारवाईत हिजबुल्लाच्या मुख्य इमारतीला लक्ष्य केले गेले आहे. या हल्यात सहा इमारती नष्ट झाल्या असून 70 हून अधिक लोक जखमी झाले. पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की, जोपर्यंत आम्ही आमचे ध्येय साध्य करत नाही तोपर्यंत हल्ले असेच सुरूच राहतील.

अमेरिकेची भूमिका

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले की, आम्हाला इस्रायलच्या कारवाईबाबत कोणतीही पूर्व कल्पना नव्हती. इस्त्रायलच्या योजनांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

हिजबुल्लाहचा टॉप कमांडर निशाण्यावर

इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराण समर्थन करत असलेल्या हिजबुल्लाच्या वरिष्ठ कमांडर्सना उद्देशून हा हल्ला करण्यात आला आहे. मात्र नसरुल्लाहबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. जर तो जिवंत असेल तर तुम्हाला लवकरच कळेल, पण तो ठार झाला असेल तर कळायला थोडा वेळ लागेल.

हिजबुल्लाहकडे 15,000 रॉकेट

आयडीएफने बेरूतच्या दहिया येथील नागरिकांना आवाहन केले आहे, जो हिजबुल्लाचे मुख्यालय म्हणून ओळखला जाते. जिथे इस्रायल बॉम्बफेक करत आहे. इस्रायलने म्हटले आहे की, हिजबुल्लाकडे 15,000 रॉकेट आहेत. ज्याद्वारे ते इस्रायलच्या लोकांना लक्ष्य करू इच्छित आहेत, आमचा लेबनॉनच्या सामान्य लोकांशी कोणताही वाद नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+