Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 490 हून अधिक लोक ठार, 18 वर्षानंतरचा सर्वात मोठा प्राणघातक हल्ला

लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 23 सप्टेंबर 2024 रोजी 90 हून अधिक महिला आणि मुलांसह 492 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2006 च्या इस्रायल-हिजबुल्ला युद्धानंतरचा हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण आणि पूर्व भागातील रहिवाशांना हिजबुल्लाहवर मोठ्या हवाई हल्ल्यांपूर्वी घरे रिकामी करण्याचा इशारा दिला होता.

लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

इस्रायलच्या हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर हजारो लेबनीज लोकांनी दक्षिणेकडील भागातून पळ काढण्यास सुरुवात केली. सिडॉन ते बेरूत या मुख्य महामार्गावर मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 2006 नंतरच्या सर्वात मोठ्या निर्गमनाचे चित्र. हे निर्गमन असूनही लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने नोंदवले आहे, की या हल्ल्यांमध्ये 35 मुले आणि 58 महिलांसह 492 लोक ठार झाले आहेत. तर 1,645 जखमी झाले. हा आकडा 2020 मध्ये बेरूत बंदरात झालेल्या स्फोटापेक्षा जास्त आहे, ज्यात 218 लोकांचा मृत्यू झाला होता.

Lebanon

नेतान्याहू यांचा इशारा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनीज नागरिकांना इस्त्रायली सैन्याच्या इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन रेकॉर्ड केलेल्या संदेशात केले. "हा इशारा गांभीर्याने घ्या आणि धोक्यापासून दूर जा. आमचे ऑपरेशन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी सुरक्षितपणे परत येऊ शकता," असं त्यांनी म्हटलं आहे.

इस्रायली लष्करी कारवाई

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, इस्रायलच्या हद्दीतून हिजबुल्लाला बाहेर काढण्यासाठी लष्कर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सोमवारच्या हवाई हल्ल्यांमध्ये इस्रायली सैन्याने 1,300 हिजबुल्ला लक्ष्यांवर हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोन नष्ट केले. हगरीने सांगितले की, हिजबुल्लाहने इस्रायलवर 9,000 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागले आहेत. एकट्या सोमवारी 250 हल्ले केले आहेत.

हिजबुल्लाचे नुकसान

या हवाई हल्ल्यांमुळे हिजबुल्लाला मोठे नुकसान झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. ही कारवाई किती काळ चालणार हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी जमिनीवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इस्त्रायली प्रवक्त्याने सांगितले की, हिजबुल्लाहने अनेक निवासी भागात आपली शस्त्रे लपवून ठेवली होती आणि त्या भागांना युद्धक्षेत्रात बदलले.

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. हिजबुल्ला आणि इस्रायलमधील संघर्ष गंभीर स्वरुपात वाढला आहे. ज्याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला आहे. हा हल्ला 2006 नंतरचा सर्वात प्राणघातक दिवस म्हणून समोर आला आहे. ज्यामुळे लेबनॉनमधील आधीच तणावपूर्ण परिस्थिती आणखी बिघडली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+