इस्रायलकडून लेबनॉनवर जमिनीवरुन हल्ले, इस्रायली रणगाडे सीमा ओलांडून हिजबुल्लाच्या ठिकाणांना टार्गेट
Israel Lebanon War: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनॉनमध्ये घूसून आता जमिनीवर हल्ले सुरु केले आहेत. इस्रायली सैन्याने (IDF) सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री लेबनॉनमध्ये एंन्ट्री केली आहे. आयडीएफने मंगळवारी सकाळी सांगितले की, सैन्याने "दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर आणि पायाभूत सुविधांवर मर्यादित, स्थानिक आणि लक्ष्यित जमिनीवर हल्ले केले आहेत." अचूक माहितीच्या आधारे हे हल्ले करण्यात येत असल्याचे आयडीएफने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
लेबनॉन 2006 च्या युद्धानंतर इस्त्रायली सैन्याने प्रथमच लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. आयडीएफने म्हटले आहे की, उत्तर सीमेजवळील लेबनीज गावांना टार्गेट करून जमिनीवरील हल्ल्याचा वापर उत्तर इस्रायलमधील इस्रायली समुदायाला तत्काळ धोका निर्माण करण्यासाठी हिजबुल्ला वापरत आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, आयडीएफ जनरल स्टाफ आणि नॉर्दर्न कमांडने मांडलेली पद्धतशीर योजना अंमलात आणेल, ज्यासाठी अलीकडच्या काही महिन्यांत सैन्य प्रशिक्षण तयारी करत आहे. आयडीएफचे म्हणणे आहे की, इस्त्रायली हवाई दल या कारवाईत आपल्या सैनिकांना मदत करत आहे.
अल-जझिराने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, जमीनीवरील हल्ल्याच्या घोषणेनंतर इस्रायली सैन्याचे रणगाडे दक्षिण लेबनॉनमधील अनेक गावांमध्ये घुसल्या आहेत. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यावर अमेरिकेनेही विधान केले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्त्यांने म्हटलं आहे की, इस्रायलने 'आम्हाला कळवलं आहे की, ते सध्या सीमेवर मर्यादित हिजबुल्ला संरचनांना टार्गेट करत मर्यादित ऑपरेशन करत आहेत.'
दरम्यान आयडीएफचे प्रवक्त्यांने एक अरबी भाषेत निवेदन जारी करून सोमवारी रात्री बेरूत उपनगरात राहणाऱ्या लोकांना बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. लेबनॉनवर इस्रायली हल्ल्याच्या भीतीने लेबनीज सैन्याने सोमवारी रात्री 9 च्या सुमारास दक्षिण लेबनॉनमधील अनेक स्थानांवरून माघार घ्यायला सुरुवात केली आहे.












Click it and Unblock the Notifications