Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Israel Iran War : इस्रायलचा असा हल्ला, ज्यात इराणच्या क्षेपणास्त्र उद्योगच उद्धवस्त! वाचा खास स्टोरी

Israel Iran War : इस्रायलच्या हल्ल्याने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे कंबरडे मोडले आहे आणि ताज्या अहवालानुसार, इराणचे 'ठोस द' साॅलीड फ्यूल मिक्सर' प्लाँट नष्ट झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा इस्रायलने इराणमधील डझनहून अधिक लक्ष्यांवर हवाई हल्ले केले.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्रायलने इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचा एक भाग म्हणून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी इंधन तयार करण्यासाठी वापरला जाणारा प्लाँट नष्ट केला आहे, ज्यामुळे तेहरानची स्वतःची इन्व्हेंट्रीला गंभीर नुकसान झाले आहे.

Israel Iran War

'सॉलिड फ्युएल मिक्सर' प्लाँटवर हल्ला

हल्ला करण्यात आलेली अत्याधुनिक लक्ष्यित उपकरणे होती. जी इराण स्वतः बनवू शकत नव्हता आणि ती चीनकडून विकत घ्यावी लागली. इस्रायली सुत्रांनी सांगितले की, ही लक्ष्ये इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा मुख्य घटक आहेत. इस्रायली सूत्रांनी असेही वृत्त दिले की चार S-300 हवाई संरक्षण प्रणाली बॅटरी, ज्या मोक्याच्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि ऑपरेशन दरम्यान तेहरानमधील आण्विक आणि ऊर्जा सुविधांचे संरक्षण करतात. ड्रोन बनवण्याचा कारखाना आणि पारचिन मिलिटरी कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये नंतरचे अण्वस्त्रांसाठी संशोधन आणि विकास उपक्रम होते, त्यावरही हल्ला करण्यात आला.

इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा कणा तुटला

इस्रायलने इराणमधील एका गुप्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्याला लक्ष्य केले ज्यामध्ये खैबर आणि हज कासेम क्षेपणास्त्रांना शक्ती देण्यासाठी वापरण्यात येणारे जड इंधन मिक्सर प्लाँट नष्ट करण्यात आले होते. या अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, हल्ला केलेल्या S-300 हवाई संरक्षण बॅटरी रशियन बनावटीच्या होत्या आणि सीरिया आणि इराकमधील या यंत्रणा आणि रडार नष्ट केले गेले.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे अहवालात म्हटले आहे. एका सुत्राने 'एलाफ'ला सांगितले की ते "इराणच्या क्षेपणास्त्र उद्योगाचा कणा" होते आणि इस्रायलने " ते उद्धवस्त केले.

" अहवालात असेही म्हटले आहे की नष्ट केलेल्या प्रत्येक जड इंधन मिक्सरची किंमत किमान दोन दशलक्ष डॉलर्स आहे आणि या प्रकारचे अंदाजे वीस मिक्सर नष्ट केले गेले आहेत. अशी उपकरणे पुन्हा सुरू होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल, असेही 'वाल्ला' यांनी म्हटले आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र उद्योगाची माहिती असलेल्या सूत्रांनी एलाफला सांगितले की, नष्ट झालेला कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+