आणखी बरंच काही घडणार! इराणने शेकडो मिसाईल डागल्यानंतर इस्त्रायलचा इशारा! PM नेत्यान्याहू काय म्हणाले
Israel iran war update : इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु असून इस्त्रायलने केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर इराणननेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. शेकडो बलॅस्टीक मिसाईल डागल्यानंतर इस्त्रायलमध्येही मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे, पण इस्त्रायलने यासंदर्भात अजून ठोस माहिती जाहीर केली नाही परंतु इराणला धडा शिकवण्यासाठी इस्त्रायली पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी आणखी बरेच काही होणार आहे असे म्हणत अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

'अजून बरेच काही घडणार आहे'
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने शुक्रवारी तेरा जून रोजी उशिरा इस्रायलवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. यापैकी सहा क्षेपणास्त्रे राजधानी तेल अवीवमध्ये पडली. हे तेहरानच्या 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस' मोहिमेअंतर्गत केले जात आहे. इराणी माध्यमांचा दावा आहे की, या क्षेपणास्त्रांचे एक लक्ष्य इस्रायली संरक्षण मंत्रालय देखील होते. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाई वाढवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की बरेच काही घडणार आहे.
नेतन्याहू यांचे व्हिडिओ स्टेटमेंट
वनइंडिया हिंदीनुसार, बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, "अजून काही होणार आहे. इराण राजवटीला माहित नाही की त्यांना काय केले आणि त्यांची आम्ही किती हानी केली अन् करणार, ते यापूर्वी कधीही इतके कमकुवत नव्हते. गेल्या २४ तासांत, आम्ही वरिष्ठ लष्करी कमांडर, वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ, इस्लामिक राजवटीची सर्वोत्तम सुविधा आणि त्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मोठा भाग नष्ट केला आहे." असेही ते म्हणाले.
इस्त्रायलचे 'ऑपरेशन रायझिंग लायन'
इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला, २०० लढाऊ विमानांनी अनेक लष्करी आणि अणु तळांना लक्ष्य केले. या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन रायझिंग लायन' असे नाव देण्यात आले आहे.
इराणची "ट्रू प्रॉमिस 3" कारवाई
इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने म्हटले आहे की डझनभर इस्रायली लष्करी तळ आणि हवाई तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. इराणने या कारवाईला "ट्रू प्रॉमिस ३" असे नाव दिले आहे.
इस्रायलवर १५० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
या हल्ल्यात ६ इराणी अणुशास्त्रज्ञ आणि २० हून अधिक लष्करी कमांडर मारले गेले, जे तेहरानसाठी मोठा धक्का होता. इराणने "ट्रू प्रॉमिस ३" नावाची मोहीम सुरू करून इस्रायलवर १५० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात ६३ लोक जखमी झाले.
पीएम मोदींशी इस्त्रायली पीएमची चर्चा
इराणने दावा केला की त्यांच्या एका क्षेपणास्त्राने इस्रायली संरक्षण मंत्रालयालाही लक्ष्य केले. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती शेअर केली.
डोनाल्ड ट्रम्पंचा इशारा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की "जर ते अणु करारात परतले नाही तर त्यांना मोठ्या हल्ल्याला सामोरे जावे लागेल." तर दुसरीकडे इराणच्या सैन्याला नवीन प्रमुख कमांडर मिळाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी मेजर जनरल अमीर हतामी यांची सेनापती-प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.












Click it and Unblock the Notifications