इस्त्रायलची अण्वस्त्र हल्ल्याची तयारी..? प्लॅनची माहीतीच झाली लीक! 'त्या' कागदपत्रांवरुन खळबळ
Israel-Iran war : याह्या सिनवार या हमासच्या म्होरक्याचा इस्रायलने काही दिवसांपूर्वी खात्मा केला. मध्य पूर्वेत अनेक ठिकाणांवर इस्रायलचे युद्ध सुरु आहे. त्यानंतर आता इस्रायलल आणखी मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. अमेरिकेच्या पेंटागनमधून लीक झालेल्या अमेरिकेच्या गुप्त विभागाच्या दस्ताएवजानंतर जगभर खळबळ उडाली आहे. गाझापट्टी आणि दक्षिण लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर, इराणवर त्याहून मोठा हल्ला करण्याची इस्रायलची योजना आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.
हल्ल्याची योजना झाली लीक
सीएनएने या युद्धाबाबत एक वृत्त दिले. त्यात इस्त्रायल काय व कसा हल्ला करणार आहे, हे इराणला समजल्याचे म्हटले आहे. इस्त्रायलचे आगामी हल्ले लीक झाल्याची बातमी सीएनएने दिल्यानंतर खळबळ उडाली.

इराणच्या विरोधात इस्रायल करत असलेल्या हल्ल्याच्या योजनेची कागदपत्रे लीक झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार अमेरिकन गुप्त एजन्सीचे दोन अत्यंत गोपनीय दस्ताएवज लीक झाले आहेत. यात इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याच्या सैन्य तयारीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
काय होते या कागदपत्रात
या कागदपत्रांत इराणवरील संभाव्य हल्ल्याची योजना, इस्रायल सैन्याची तयारी, हवेतून हवेत इंधन भरण्याची मोहीम, शोध आणि बचाव मोहीम आणि संभाव्य मिसाईल सिस्टीम याची माहिती दिलेली आहे. नॅशनल जियोस्पेशियल-इंटेलिजिन्स एजन्सीच्या सॅटेलाईट फोटोच्या आधारे हा दावा करण्यात आला होता. यात शस्रास्र आणि दारुगोळा स्थलांतरीत करण्याचाही उल्लेख आहे. दुसरी कागदपत्रात इस्रायलच्या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलसंबंधी इस्रायलच्या वायू सेनेच्या अभ्यासाविषयी होती. इस्रायल इराणविरोधात अण्वस्र वापरणार का, याचा उलगडा मात्र या कागदपत्रांवरुन झालेला नव्हता.
फाईव्ह आईज संबंधी चौकशी होणार
ही गुप्त माहिती लीक झाल्यानंतर अमेरिकेसह अनेकांची चिंता वाढली. पेंटागनच्या फाईव्ह आईज संबंधी माहिती लीक झाल्याच्या प्रकरणाची अमेरिकेने आता चौकशी सुरु केली आहे. 15 आणि 16 ऑक्टोबरच्या तारखेचे हे गुप्त दस्ताएवज इराणशी संबंधीत एका टेलिग्राम अकाऊंट 'मिडल ईस्ट स्पेक्टेटर'वर प्रसिद्ध झाले आहेत. टॉप सीक्रेट म्हणून क्लासीफाईड असे या कागदपत्रांवर निशाण आहेत. हे दस्ताऐवज केवळ अमेरिका आणि त्याचे फाईव्ह आईज म्हणजेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि ब्रिटनयांच्याकडेच हवेत असे त्यात म्हटले आहे.
एफबीआय झाली तत्पर
ही कथित पेंटागनची कागदपत्रं आणि त्यांच्या लीक होण्याने एफबीआय देखील तत्पर झाली असल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. परंतू एफबीआयने या संदर्भात अजून काहीही वक्तव्य केलेले नाही. प्राथमिक तपासानुसार काही कनिष्ठ स्तरावरील अमेरिकन अधिकाऱ्यांच्या पातळीवरुन हे कागदपत्रं लीक झाली असावीत, असे म्हटले जात आहे. या गोपनीय कागदपत्रांच्या लीक झाल्याने अमेरिका आणि इस्रायल संबंधावर देखील परिणाम होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे.












Click it and Unblock the Notifications