Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Israel-Iran War : इस्रायलचा इराणवर 'ऑपरेशन विनाश'; बंदर अब्बास अन् मेहराबाद धुराच्या लोटात!

Israel Iran War Latest News : मध्य पूर्वेतील संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. शनिवारी रात्री इस्रायली हवाई दलाने इराणच्या लष्करी आणि सामरिक तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. या हल्ल्यात इराणचा प्रमुख नौदल तळ 'बंदर अब्बास' आणि राजधानीतील 'मेहराबाद' विमानतळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून संपूर्ण परिसर धुराच्या लोटात बुडाला आहे.

Israel Iran War Latest News

80 हून अधिक लढाऊ विमानांचा थरार

इस्रायली लष्कराने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, हे हवाई हल्ले अत्यंत नियोजित होते. सुमारे ८० हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमानांनी एकाच वेळी इराणच्या विविध भागांत प्रवेश केला.

यात प्रामुख्याने राजधानी तेहरान, मध्यवर्ती शहर इस्फहान आणि किनारपट्टीवरील बंदर अब्बास येथील नौदल तळाला लक्ष्य करण्यात आले. इस्फहानमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटांनी संपूर्ण शहर हादरले असून, इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र तळांना मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मेहराबाद आणि बंदर अब्बासवर अचूक निशाणा

इस्रायलने या मोहिमेत इराणच्या दळणवळण आणि नौदल शक्तीला सुरुंग लावला आहे.

मेहराबाद विमानतळ : तेहरानमधील हे महत्त्वाचे विमानतळ इस्रायली क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले, ज्यामुळे इराणची हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बंदर अब्बास नौदल तळ : इराणच्या नौदलाचा कणा मानल्या जाणाऱ्या या तळावर झालेल्या हल्ल्यामुळे इराणच्या सागरी शक्तीला मोठी खीळ बसली आहे.

राष्ट्रपती पेझेश्कियान यांचे विधान आणि 'पुतिन' यांच्याशी चर्चा

हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित केले. "इराण आता शेजारील देशांवर हल्ला करणार नाही," असे विधान त्यांनी केले.

हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण इराणने यापूर्वी अनेकदा आखाती देशांना लक्ष्य केले होते. याच दरम्यान, पेझेश्कियान यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली आहे.

शांततेच्या आवाहनानंतर पुन्हा सायरनचा थरकाप

इराणी राष्ट्राध्यक्षांनी शांततेचे सूतोवाच केल्यानंतर काही वेळातच परिस्थिती पुन्हा स्फोटक बनली. कतार आणि बहरीनमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

हे सायरन सूचित करत होते की, इराणकडून प्रति-हल्ला किंवा ड्रोन हल्ल्याची शक्यता अद्याप मावळलेली नाही. इस्रायलने आपल्या सुरक्षेसाठी हे हल्ले करणे आवश्यक होते. जोपर्यंत इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा धोका कायम आहे, तोपर्यंत आमची कारवाई थांबणार नाही, असे इस्रायली लष्करी प्रवक्ता यांनी सांगितले.

युद्धाचा दुसरा आठवडा: जगाचे लक्ष इराणकडे

हे युद्ध आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून शेकडो क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी दर्शवली आहे.

इराणच्या राजवटीशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करून इस्रायलने इराणला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत करण्याचा विडा उचलल्याचे दिसत आहे. या भीषण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळीवर काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+