इराणमध्ये लाईव्ह दरम्यान सरकारी न्यूजरूममध्ये स्फोट! बुरखा घातलेला अँकरने काढला पळ, बघा VIDEO
Israel Iran War Anchor escapes after explosion in newsroom : इराण इस्त्रायल संघर्षादरम्यान, आता हल्ल्याची तीव्रता वाढत आहे. इराण काही कमी नसून इस्त्रायलवर सतत क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला जात आहे. अशातच एक व्हडिओ समोर आला आहे. 16 जून रोजी इस्रायली सैन्याने इराणच्या सरकारी वृत्तसंस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण न्यूज नेटवर्क (IRINN) च्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला.
या हल्ल्यात न्यूज रुमला जबरदस्त तडाखा बसला. हादरा बसल्यानंतर न्यूज अँकरने घटनास्थळाहून पळ काढला आहे. याचा व्हिडिओ आता जगभर व्हायरल होत आहे.

नेमका काय घडला प्रकार..
हल्ला करण्यात आलेले इराण न्यूज नेटवर्क (IRINN) इराणच्या राज्य माध्यम संघटना IRIB द्वारे चालवले जाते. हल्ल्याच्या वेळी, चॅनेलवर लाईव्ह बुलेटिन चालू होते, लाईव्ह शोमध्ये एक बुरघा महिला अँकर दिसत होती पण हल्ला झाल्यानंतर स्टुडीओत मोठा स्फाटाचा आवाज आला आणि लाईव्ह शो अचानक बंद करण्यात आला, त्यानंतर या शोऐवजी पुर्व रेकाॅर्डेड शो सुरु करण्यात आला.
BREAKING: Iran’s state TV says it is being attacked by Israel. pic.twitter.com/1wKC9BgWD5
— Clash Report (@clashreport) June 16, 2025
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सरकारी वृत्तसंस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण न्यूज नेटवर्क (IRINN) च्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, न्यूज अँकर सहर इमामी त्यावेळी लाईव्ह बुलेटिन वाचत असल्याचे दिसून येते. स्फोट होताच संपूर्ण स्टुडिओ हादरला आणि अँकरला त्यांची जागा सोडून पळून जावे लागले. या घटनेनंतर "अल्लाह-हू-अकबर" चे आवाज देखील ऐकू येत आहेत. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
अँकरची स्थिती काय..
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सहर इमामी आणि स्टुडिओ कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणालाही दुखापत झालेली नाही. काही वृत्तांत असाही दावा करतात की अँकर नंतर त्याच्या डेस्कवर परतला आणि पुन्हा रिपोर्टिंग सुरू केले, जरी या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
मुख्यालय परिसरात आधीच दिला होता इस्त्रायलने इशारा
दरम्यान, हल्ल्याच्या काही तासांपुर्वीच इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने IRIB च्या मुख्यालयाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना तातडीचा इशारा जारी केला होता. तसेच हा भाग खाली करावा असे सुचित करण्यात आले होते. यानंतर हा हल्ला झाला असून या स्टुडिओचे मागील भागाचे हल्ल्यात नुकसान झाले आहे.
काय म्हणाले इस्रायली संरक्षण मंत्री...
इस्रायली संरक्षण मंत्री म्हणाले - इराणी प्रचार कायमचा थांबणार आहे इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की "इराणी प्रचार आणि चिथावणीची जीभ लवकरच कायमची बंद होणार आहे." इस्रायल म्हणतो की ते त्यांचे धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. दुसरीकडे, बॉम्बस्फोटादरम्यान दोन्ही देशांचे सामान्य नागरिक आपले प्राण वाचवण्यासाठी धावत आहेत. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे आणि या प्रदेशातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे.












Click it and Unblock the Notifications