Israel Lebanon Conflict: वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इस्रायलचा पुन्हा लेबनॉनवर हवाई हल्ला!
Israel Lebanon Conflict : हमासच्या हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. रविवारी स्थानिक वेळेनुसार इस्रायलने लेबनॉनच्या बेरूत आणि त्याच्या उपनगरांवर हवाई हल्ले केले आहेत. ज्यात अनेक लोक मारले गेले माहिती समोर आली आहे. हिजबुल्लाहने इस्रायली शहर हैफाला टार्गैट करून प्रत्युत्तर दिलं आहे.
रविवारी इस्रायली युद्ध विमानांनी बेरूतच्या दक्षिण उपनगरात आणि इतर भागांवर हवाई हल्ले केल आहेत. इस्रायली सैन्याने वृत्तला दुजोरा देत म्हटलं आहे की, हे हल्ले इराण समर्थित हिजबुल्लाहच्या टार्गैटवर होते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बेरूतजवळ एका इस्रायली हल्ल्यात तीन मुलांसह सहा जण ठार झाल्याची माहिती आहे.

प्रत्युत्तरादाखलत हिजबुल्लाहने सोमवारी 7 ऑक्टोबर इस्रायलच्या हैफा शहरावर "फादी 1" क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. ज्यात 10 लोक जखमी झाले असून काही इमारतींचे नुकसान झालं आहे. हिजबुल्लाहने दावा केला आहे की, त्यांनी हैफाच्या दक्षिणेस लष्करी तळाला टार्गैट केले आहे.
इस्रायल-लेबनॉनमधील वाढता संघर्ष
इस्रायलच्या हल्ल्यानंतर रविवारी रात्री लेबनॉनची राजधानी बेरूतच्या आकाशात ज्वाला आणि स्फोटांचे प्रतिध्वनी ऐकूायला आले. इस्रायलने हिजबुल्लाचे गुप्तचर मुख्यालय आणि शस्त्रास्त्रे खाना असलेल्या इमारतीला टार्गेट करण्यात आलं. इस्त्रायली सैन्याने म्हटलं आहे की, त्यांनी दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यातील हिजबुल्लाच्या ठिकाणावर देखील हल्ला केला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार इस्रायलने लेबनॉनमध्ये सुमारे 30 हल्ले करण्यात आले आहेत, तर लेबनॉनमधून सुमारे 130 क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हद्दीत डागण्यात आली आहेत.
#WATCH | Massive explosion in Sin el Fil of Mount Lebanon Governorate amid the ongoing conflict between Israel and the Lebanese armed movement Hezbollah.
— ANI (@ANI) October 7, 2024
October 7, 2024, marks the first anniversary of Hamas's attack on Israel
(Source: Reuters) pic.twitter.com/giRzmrLP3u
इस्रायल-इराण संघर्षाची भीती!
इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढत्या संघर्षादरम्यान इराण देखील या संघर्षात गंभीरपणे अडकला आहे. इस्रायलविरुद्धच्या लढाईत इराणचे सहयोगी गट हमास आणि हिजबुल्ला यांची मोठी भूमिका आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवर हल्ला करण्याची धमकी दिल्याने प्रादेशिक संघर्षाची शक्यता आणखी वाढली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपला देश विजयी होईल असं म्हटले आहे. इस्रायली सैन्याने हमासच्या हल्ल्याच्या एका वर्षानंतर "परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे". इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी म्हटलं आहे की, इस्त्रायल अमेरिकेशी समन्वय साधायचा की नाही हे स्वतःचे निर्णय घेईल.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांशी बातचीत
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी फोनवर बातचीत झाली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता आणि युद्धला पूर्णविराम देण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या "अतूट वचनबद्धतेचा" पुनरुच्चार केला. त्याच वेळी, अमेरिकेने इस्रायलच्या बॉम्बफेकीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, लष्करी दबाव राजनैतिक तोडगा काढण्यासाठी मदत करू शकतो, परंतु यामुळे धोकादायक गैरसमजांचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications