इस्माईली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Aga Khan Death : इस्माईली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं आहे. आगा खान फाउंडेशन आणि इस्माईली धार्मिक समुदायाने त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केले की त्यांचे 49 वे इमाम यांचं मंगळवारी निधन झालं आहे. त्यांच्या उत्तराधिकारीची घोषणा नंतर केली जाईल, असं वेबसाइटच्या वृत्ता म्हटलं आहे.
आगा खान फाउंडेशन आणि इस्माईली धार्मिक समुदायाने जाहीर केले की महामहिम राजकुमार कारीब अल-हुसेनी आगा खान आणि शिया इस्माईली मुस्लिमांचे 49 वे वंशपरंपरागत इमाम यांचे मंगळवारी पोर्तुगालमध्ये निधन झालं आहे.

आगा खान यांनी वयाच्या 20 व्या वर्षी इस्माईली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते बनले होते. इस्माईली मुस्लिमांना आध्यात्मिक नेतृत्व देण्यासोबतच त्यांनी अब्जावधी डॉलर्सच्या मदतीने विकसनशील देशांमध्ये घरे, रुग्णालये आणि शाळा बांधणे यासारख्या लोककल्याणकारी कामासाठी त्याची एक खास ओळख निर्माण होती. त्यांनी रुग्णालये आणि शाळांना मदत करण्यासाठी त्याच्याकडे असलेले सर्व संपती दान केली होती.
आगा खान यांची लोकप्रियता
आगा खान हे धार्मिक नेते सोबतच लोकांना मदत करण्यासाठी त्यांची खास ओळख होती. आगा खान यांनी सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात समतोल राखला होता. त्यांना राज्याचे प्रमुख म्हणून मान्यता मिळाल्यानंतर 1957 मध्ये राणी एलिझाबेथ यांनी त्यांना महामहिम म्हणून संबोधले होते. आगा खान यांचे आजोबा, आगा खान यांनी त्यांना 1,300 वर्ष जुन्या राजवंशाचा उत्तराधिकारी बनवले. यानंतर फक्त दोन आठवड्यांनी राणीने त्यांना महामहीम' ही पदवी दिली.
सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित जीवन
आगा खान यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित केलं आहे. त्यांनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क (AKDN) ची स्थापना केली, ज्यामध्ये आज 96,000 लोक रोजगार देतात. तसेच आरोग्यसेवा, शिक्षण, गृहनिर्माण आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करतात. त्यांचे कार्य अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ताजिकिस्तानसह अनेक देशांमध्ये पसरलं आहे. त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्था आणि आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये मोठं योगदान आहे.












Click it and Unblock the Notifications