Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संघर्ष वाढला! अमेरिकेतील प्रत्येक सैनिक,लोक आमच्या निशाण्यावर; अणूकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणची धमकी!

Iran warns America after attack on nuclear facility : अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहानसह इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत इराणला इशारा दिला. त्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर आले आहे. अमेरिकेचा प्रत्येक नागरीक, सैनिक आपल्या निशाण्यावर असल्याचा इशारा इराणने दिला आहे.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन हा इशारा अमेरिकेला देण्यात आला आहे. आता इस्त्रायल इराण संघर्षात अमेरिकेची एंट्री झाली असून अमेरिका आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य-पुर्वमधील तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इस्त्रायलला एकप्रकारे पाठबळ मिळाले आहे, अमेरिका आतापर्यंत युद्धात मध्यस्ती करत होता पण आता तर इराणवर थेट हल्ले करत युद्धात उतरला आहे.

Iran warns America after attack on nuclear facility

काय दिला इराणने इशारा?

अमेरिकेने अणूस्थळांना लक्ष्य केल्यानंतर इराण संतप्त झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्याकडून वैयक्तिक प्रतिक्रीया जरी अद्याप आली नसली तरीही इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांवरुन इराणने अमेरिकेला संदेश दिला आहे. अमेरिकेचा प्रत्येक सैनिक आणि नागरिक
इराणचे लक्ष्य असल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. या इशाऱ्यामुळे मध्य-पूर्वमध्ये युद्धाचे ढग आणखीनच गडद झाले आहेत

ट्रम्प यांनी इराणला काय दिली धमकी?

आता इराणने शांतता बाळगायला हवी जर त्यांनी असे केले नाही तर भविष्यात विनाश होईल अर्थात आता जसे केले तसे मोठे हल्ले होतील.. एकतर शांतता राहील किंवा विद्धवंस होईल. मागील आठ दिवसांत जे पाहिले त्यापेक्षा मोठा विद्धवंस होईल. अजूनही काही लक्ष्य आहेत जे हल्ल्यापासून वाचले आहेत असे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अणू केंद्रावरील हल्ल्याचा उद्देश काय, म्हणाले ट्रम्प?

इराणच्या अणू केंद्रावरील हल्ल्यांचा उद्देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला, ते म्हणाले की, इराणची अणूसंवर्धन क्षमता नष्ट करणे हे आमचे लक्ष्य आहे. कारण जगातील पहिल्या क्रमाकांच्या दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांच्या देशात इराण आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे, त्यामुळे या देशाचा अणू कार्यक्रमाला थांबवणे आपले उद्देश आहे असे त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या सैनिकांचे कौतूक करताना ट्रम्प यांनी इराणच्या तीन ठिकाणांवर रात्री अमेरिकन सैनिकांनी जो हल्ला केला तो आमच्या सैनिकांचे शानदार यश असे त्यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+