इराण-इस्रायल संघर्षात 'या' देशाची उडी; अमेरिकेला थेट इशारा, तिसऱ्या महायुद्धाचे संकेत?
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, या संघर्षात अमेरिकेच्या सहभागानंतर आणखी एक शक्तिशाली देश मैदानात उतरला आहे. येमेनने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, तो इराणच्या बाजूने युद्धात उतरणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला असून, संभाव्य महायुद्धाचे संकट गडद झाल्याचे चित्र दिसत आहे.

येमेंटर्फे युद्धात सहभागाची घोषणा
येमेनच्या लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरीअ यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या निवेदनात सांगितले की, "येमेंटर्फे अमेरिका आणि इस्रायलविरोधातील युद्धात आम्ही अधिकृतरित्या सहभागी होत आहोत." त्यांनी अमेरिकेला आणि इस्रायलला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "तुमच्या युद्धनौका आमच्या सागरी सीमांपासून दूर ठेवा, अन्यथा परिणाम गंभीर भोगावे लागतील."
रशियाची तटस्थ भूमिका, पण येमेनचा थेट हस्तक्षेप
इराणने आधी रशियाकडे मदतीची विनंती केली होती. मात्र रशियाने सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, येमेनचा इराणच्या बाजूने युद्धात उडी मारणे हे इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त मोर्चासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
अमेरिकेचे हवाई हल्ले ठरले निर्णायक
युद्धाचा भडका उडाल्यानंतर अमेरिका सुद्धा सक्रिय झाली. 'मिडनाईट हॅमर' या विशेष मोहिमेअंतर्गत अमेरिकेने इराणमधील फोर्दो, नतांज आणि इस्फान या प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. इस्रायलनेही या मोहिमेत सहभागी होत फोर्दोवर जोरदार हल्ला केला.
आंतरराष्ट्रीय तणाव वाढण्याची शक्यता
येमेनने युद्धात उडी घेतल्यानंतर गाझा, सीरिया, लेबनॉन आणि इतर इस्लामी राष्ट्रांवरील इस्रायली कारवायांवरही आक्षेप घेतला आहे. सरीअ यांनी म्हटले आहे की, "इस्रायल आणि अमेरिकेची जोडी जगात अस्थिरता निर्माण करत आहे, आणि आम्ही त्यास विरोध करणारच."
सागरी सुरक्षेबाबतही इशारा
येमेनकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर अमेरिका आणि इस्रायलने येमेनच्या सागरी सीमांचं उल्लंघन केलं, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. या घोषणेनंतर अरबी समुद्र आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नौदल हालचालींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
आता पुढे काय?
इराण-इस्रायल संघर्ष आधीच भयंकर रूप घेत असतानाच, येमेनच्या प्रवेशामुळे हे युद्ध आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलपुढे आता द्विपक्षीय नव्हे तर बहुपक्षीय संघर्षाचे आव्हान उभे राहणार आहे. तज्ज्ञांच्या मते, जर यामध्ये इतर अरब देशांचा सहभाग वाढला, तर हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाऊ शकते.
सध्या सुरू असलेली ही घडामोड केवळ मध्यपूर्वच नव्हे तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी आव्हान निर्माण करत आहे. येत्या काही दिवसांत घडणाऱ्या घटना जागतिक शांततेच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे या परिस्थितीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.












Click it and Unblock the Notifications