Iran Israel war : ट्रम्पच्या धमकीनंतर चवताळले इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी म्हणाले - आता लढा सुरु!
Iran Israel war Trump's threat : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकावल्यानंर तेहरान स्फोटांनी हादरले आहेत, तर दुसरीकडे इस्रायलने पुन्हा इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा केला आहे, अशा स्थितीत आता अमेरिकेने सुनावल्यानंतर इराणचे मुख्य नेते अली हुसेन खोमेनी यांनी आता लढाई सुरु असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

खोमेनी यांना सध्या मारणार नाही...! - डोनाल्ड ट्रम्प
मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या हवाई हल्ल्यावर संपूर्ण नियंत्रण असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच इराणचे सर्वोच्च नेते कुठे लपले आहेत हे आम्हाला माहित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पण सध्या आम्ही त्यांना मारणार नाही असेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.
ट्रम्प यांनी इराणला काय दिली धमकी?
इराणने विनाअट शरणागती पत्करावी, अशी थेट भुमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे तर दुसरीकडे इराणवर इस्त्रायलचे हल्ले सुरु आहेत, इराणही काही कमी नसून हा देशही इस्त्रायलला चोख प्रत्युत्तर देत आहे.
इराणचे सर्वोच्च नेते काय म्हणाले?
इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खोमेनी यांनी ट्रम्प यांच्या धमकीनंतर कडक भुमिका घेतली आहे. शरणागती पत्करा असे ट्रम्प यांनी म्हटल्यानंतर याउलट त्यांनी आता लढाई सुरु असे म्हणत ट्रम्प यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
इराणचे अणू आणि लष्करी तळं लक्ष्य
दरम्यान, इराणची राजधानी तेहरान अचानक मोठ्या स्फोटांनी हादरली असतानाच इस्रायलने अनेक जोरदार हवाई हल्ले केले, ज्यामुळे शहरातील इमारती हादरल्या. इस्रायलने आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि थेट हल्ला असल्याचे मानले जाते, ज्याचा उद्देश इराणच्या अणु आणि लष्करी तळांना गंभीर नुकसान पोहोचवणे होता. हे हल्ले अशा वेळी झाले जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानमधील रहिवाशांना शहर रिकामे करण्याचा इशारा दिला होता आणि इराणकडून बिनशर्त आत्मसमर्पण करण्याची मागणी केली होती.
बुधवारी (१८ मे) पहाटे ५ वाजताच्या सुमारास संपूर्ण तेहरान एका मोठ्या स्फोटाने हादरले. याआधीही रात्रीच्या अंधारात अनेक स्फोट ऐकू आले होते. जरी इराणी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांना कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया दिली नाही, जसे की अलिकडच्या काळात त्यांची रणनीती होती, परंतु स्थानिक रहिवाशांनी मोठ्या स्फोटांना दुजोरा दिला आहे.
इस्रायली लष्करी कारवाईत आतापर्यंत किमान २२४ इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इराणच्या प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात २४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारपासून इराणने ४०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोन डागले आहेत, त्यापैकी बहुतेक इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रोखले.
अणुऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) पुष्टी केली आहे की इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे नतान्झ युरेनियम समृद्धीकरण स्थळाच्या भूमिगत सेंट्रीफ्यूज हॉलचे नुकसान झाले आहे. अत्यंत सुरक्षित, खोलवर बांधलेल्या या संकुलावर थेट हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे.












Click it and Unblock the Notifications