इराणने अमेरिकेचा घेतला बदला; ट्रम्प यांनी विचारही केला नव्हता, USचे लष्करी तळ उद्धवस्त!
Israel Iran US War Latest Marathi news : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध आता नवीन वळणावर येऊन ठेपले आहे. इराणच्या अणु तळांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर, इराण कसा शांत बसणार. त्याने देखील अवघ्या 36 तासांमध्ये अमेरिकेला प्रत्युत्तर दिले.
सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील अमेरिकेच्या लष्करी तळावर रशियाकडून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील तणाव आता आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इराणची आघाडीची वृत्तसंस्था MEHR यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामुळे जागतिक सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेच्या एंट्रीने व त्याला दिलेल्या प्रत्युत्तराने कोणती दिशा मिळणार, हे देखील काळच ठरवणार आहे.

अमेरिका-इराण यांच्यातील तणाव तीव्र
वृत्तसंस्था MEHRने सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, सोमवारी (23 जून) सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर, तळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
या हल्ल्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढू शकतो आणि पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मेहर न्यूज एजन्सीच्या मते, या हल्ल्यामुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेला आव्हान मिळाले आहे आणि स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल देखील सतर्क झाले आहेत.
मध्य पूर्वेतील परिस्थिती भयावह!
21 जूनच्या रात्री अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणु केंद्र फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर लष्करी कारवाई केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या कारवाईला लष्करी यश म्हटले गेले, तर इराणने ते आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि अणुप्रसार अप्रसार कराराचे (एनपीटी) गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, युद्ध अधिक धोकादायक टप्प्यावर आले आहे. परिस्थिती सतत बिघडत चालली आहे आणि या प्रदेशात पूर्ण युद्ध होण्याची भीती वाढत आहे.
अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील हा नवीनतम संघर्ष आता लष्करी आघाडीवर पोहोचला आहे आणि त्याची आग संपूर्ण मध्य पूर्वेला वेढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.












Click it and Unblock the Notifications