Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अणुतळांवरील हल्ल्याचा इराणने अमेरिकेचा हिशोब केला चुकता! कतारमधील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्रे डागली!

Iran-Israel war : मध्य पूर्व मधील संघर्ष आता विकोपाला गेल्याची चिन्हे आहेत. इराण आणि इस्त्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेत इराणची तीन अणू स्थळ उडवले होते. यानंतर इराण बदला घेणार हेही अमेरिकेला माहित होते आणि ही भिती खरी ठरली. या हल्ल्यानंतर इराणने काही वेळापुर्वीच अमेरिकेच्या कतारमधील लष्करी तळावर सहा मिसाईल डागल्या.

Iran-Israel war

अमेरिकेने कल्पनाही केली नसेल असा हा हल्ला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेने अणूस्थळावर केलेल्या हल्ल्याचा अखेर इराणने वचपा काढला. अमेरिकेने तेहरानच्या प्रमुख अणु स्थळांवर हल्ला केला. यात इराणच्या तीन अणूस्थळांना नष्ट केल्याचा युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा होता. या हल्ल्यानंतर इराणने इराणने सोमवारी २३ जून रोजी अमेरिकेला योग्य प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता.

युएस लष्करी तळावर सहा क्षेपणास्त्र डागली!

इराणच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेला इशारा दिल्यानंतर लगेचच इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर सहा क्षेपणास्त्रे डागली. इराणी सरकारी टेलिव्हिजनने 'ऑपरेशन बशरत फतेह' सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अल उदेद हवाई तळावरील हल्ल्याचे वर्णन तेहरानने अमेरिकेच्या "खुल्या लष्करी आक्रमणाविरुद्धच्या मोहिमेचा भाग" म्हणून केले आहे.

इराणने ३६ तासांत योग्य सूड घेतला!

रॉयटर्स आणि एएफपी वृत्तसंस्थांच्या मते, इराणने केलेल्या हल्ल्यानंतर क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर कतारची राजधानी दोहामध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. कतारच्या दोहाबाहेर असलेल्या अल उदेद हवाई तळावर सुमारे दहा हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. मध्य पूर्वेतील हे सर्वात मोठे अमेरिकन लष्करी तळ आहे आणि संपूर्ण प्रदेशातील ऑपरेशन्ससाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते, आता इराणला अमेरिका काय उत्तर देते हेही पाहावे लागणार आहे.

कतारमधील भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, कतारमधील भारतीय समुदायाला सावधगिरी बाळगण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. कृपया शांत रहा आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा. दूतावास आमच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील अपडेट देत राहील.

थेट प्रत्युत्तर देऊ शकतो -कतार परराष्ट्र मंत्रालय

कतारच्या पंतप्रधानांचे सल्लागार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी ट्विट केले की, "इराणी क्रांतिकारी रक्षकांनी अल-उदेद हवाई तळावर केलेल्या हल्ल्याचा कतार राज्य तीव्र निषेध करते. आम्ही हे कतार राज्याच्या सार्वभौमत्वाचे, त्याच्या हवाई क्षेत्राचे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे घोर उल्लंघन मानतो. आम्ही पुन्हा एकदा पुष्टी करतो की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या आक्रमकतेच्या स्वरूपाचे आणि प्रमाणाचे थेट प्रत्युत्तर देण्याचा अधिकार कतार राखून ठेवतो..."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+