Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराण-इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, भारतात स्थिती काय? पेट्रोलियम मंत्री म्हणाले

इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीला अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे नवसंजीवनी मिळाल्याने संपूर्ण मध्यपूर्व अशांत झाला आहे. परिणामी, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $80 च्या आसपास पोहोचला असतानाही भारतातील इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Iran Israel conflict oil prices


भारताच्या ग्राहकांना सध्या दिलासा

जगभरात तणावाचे वातावरण असतानाही, भारतात इंधन दर स्थिर आहेत. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, "सध्या घाबरण्याचे कारण नाही." सरकार आवश्यक तयारी करत असून भारत इंधनाच्या पुरवठ्यासाठी केवळ एका मार्गावर अवलंबून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत सरकार सतर्क

हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतात दररोज सुमारे 1.5 ते 2 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची आयात होते. मात्र भारताची एकूण गरज दररोज 5.5 दशलक्ष बॅरल इतकी आहे. उर्वरित तेल इतर मार्गांद्वारे आयात केले जाते. "आपल्या देशातील तेल विपणन कंपन्यांकडे 25 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आत्तातरी पुरवठ्याची चिंता करण्याचे कारण नाही," असंही पुरी यांनी सांगितलं.

पंतप्रधानांच्या पातळीवर प्रयत्न सुरू

पुरी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहे. पंतप्रधानांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आवाहनही केले आहे.

भारताची कच्च्या तेलाबाबतची स्थिती मजबूत

अमेरिका, रशिया, ब्राझील, पश्चिम आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका अशा विविध देशांमधून भारत कच्च्या तेलाची आयात करतो. या सर्व पर्यायी स्रोतांमुळे भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे, असं ऊर्जातज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे, भारताचा प्रमुख पुरवठादार कतार हा होर्मुझ मार्गाचा वापर करत नाही, त्यामुळे तेथून येणाऱ्या एलएनजीवर परिणाम होणार नाही.

रशियाकडून आयात वाढवली

इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर जून महिन्यात भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी लक्षणीयरीत्या वाढवली आहे. 20 ते 22 लाख बॅरल प्रतिदिन या दराने तेल खरेदी होत असून, हा आकडा मागील दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. याच महिन्यात अमेरिकेकडूनही 4.39 लाख बॅरल प्रतिदिन तेल खरेदी करण्यात आले आहे, जे मागच्या महिन्याच्या तुलनेत जास्त आहे.

नजीकच्या काळात दर वाढू शकतात, पण धोका कमी

तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील वाढता तणाव नजीकच्या काळात कच्च्या तेलाच्या दरात वाढ करू शकतो. किंमती $80 प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात. मात्र भारताने आवश्यक पर्याय तयार ठेवले आहेत, त्यामुळे देशातील ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता फारशी नाही.

इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरात ऊर्जा सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण असले तरी भारत सरकारने विविध स्रोतांद्वारे पुरवठा सुनिश्चित केल्यामुळे सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सरकारच्या पातळीवर सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+