Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराणच्या धर्मगुरूंनी ट्रम्प अन् नेतन्याहू यांच्याविरुद्ध काढला फतवा; म्हटले-हे अल्लाहाचे दुश्मन...

Iran issued fatwa against Donald Trump and Netanyahu : इराण-इस्त्रायल यांच्यात सद्या शीजफायर झालेला आहे. परंतु, दोन्ही देशातील नेत्यांकडून एकमेकांविरोधात वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यात अमेरिकेने या युद्धात उडी मारून इराणचे मोठे नुकसान केले. त्यानंतर मात्र इराण चांगलाच संतापला आहे. त्यात आता इराणच्या सर्वोच्च धर्मगुरुंनी डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू विरोधात उभे राण्यासाठी जगभरातील मुस्लिमांना आवाहन केले.

धर्मगुरुंनी काढला दोघांविरोधात फतवा!

इराणचे सर्वात ज्येष्ठ शिया धर्मगुरू ग्रँड अयातुल्ला नासिर मकरिम शिराजी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध धार्मिक फतवा जारी केलाय.

त्यांनी या दोन्ही नेत्यांना 'अल्लाहचे शत्रू' म्हटले आहे. त्यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येऊन इराणवर हल्ला केल्याबद्दल या नेत्यांना पश्चात्ताप करण्यास भाग पाडा, असा संदेश दिला आहे.

मकरिम शिराजी यांनी त्यांच्या फतव्यात म्हटले आहे...

जो कोणी इराणच्या सर्वोच्च नेत्याला किंवा कोणत्याही मर्जाला हानी पोहोचवण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करेल तो मोहरीब म्हणजेच युद्धप्रेमी गुन्हेगार असेल.

जगभरातील मुस्लिमांना एक होण्याचे आवाहन!

फतव्यामध्ये म्हटले की, जगभरातील मुस्लिमांना ट्रम्प आणि नेतान्याहू सारख्या नेत्यांच्या "धमक्या आणि हल्ल्यां" विरोधात एकत्र येण्याचे आणि त्यांना पश्चात्ताप करण्यास भाग पाडण्याचे आवाहन केले आहे.

धार्मिक नेत्याने लिहिले - "जर एखाद्या मुस्लिमाने त्याच्या धर्माच्या आणि नेतृत्वाच्या रक्षणासाठी बलिदान दिले तर त्याला अल्लाहच्या मार्गात लढणारा योद्धा म्हटले जाईल."

a fatwa against Donald Trump and Netanyahu

इराणलाही युद्धबंदीवर नाही विश्वास!

अलीकडेच, इराण आणि इस्रायलमधील 12 दिवसांच्या युद्धानंतर, अमेरिकेने 24 जून रोजी युद्धबंदीची घोषणा केली. तथापि, इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी अब्दुलरहीम मौसावी यांनी या युद्धबंदीवर विश्वास नाही. त्यांनी सौदी संरक्षणमंत्र्यांशी झालेल्या संभाषणात म्हटले आहे - "जर शत्रूने (इस्रायलने) पुन्हा हल्ला केला तर आम्ही योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

इराणने अमेरिकाचा दावा फेटाळला!

IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी) नुसार, इराणकडे 60 % शुद्ध युरेनियमचा साठा आहे, जो अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसा आहे.

अमेरिकेने दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या B-2 बॉम्बर्सने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान सारख्या अनेक इराणी अणुस्थळे नष्ट केली आहेत, परंतु IAEA म्हणते की काही अणुस्थळे अजूनही सुरक्षित आहेत.

एविन तुरुंगावर हल्ल्यात 71 जण ठार

23 जून रोजी तेहरानच्या एविन तुरुंगावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान 71 जण ठार झाले. यामध्ये तुरुंग कर्मचारी, कैदी, सुरक्षा कर्मचारी आणि पाहुणे यांचा समावेश होता. हे तुरुंग इराणी राजवटीविरुद्ध बोलल्याबद्दल तुरुंगात असलेल्या राजकीय कैद्यांसाठी कुप्रसिद्ध आहे.

इराणचा अमेरिकेला थेट इशारा!

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांना सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणे थांबवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, "जर अमेरिकेला करार हवा असेल तर ट्रम्प यांना त्यांची भाषा आणि दृष्टिकोन बदलावा लागेल. सर्वोच्च नेत्यावर टीका करणे हे त्यांच्या समर्थकांचा अपमान मानावा लागेल.

फतव्यामागे नेमका हेतू काय?

अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणी नेतृत्वाला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. धार्मिक फतव्याद्वारे शिराजी यांनी असा संदेश दिला आहे की आता मुस्लिम जगाला एकत्रितपणे प्रत्युत्तर द्यावे लागेल. हा फतवा केवळ धार्मिकच नव्हे तर राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्याही एक मोठे पाऊल मानले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+